स्पेशल

अहिल्यानगर शहरातील महिलांना रोजगारासाठी मिळणार पिंक ई रिक्षा ! शहरातील इच्छुक महिलांना अर्ज भरण्यासाठी महानगरपालिकेत सुविधा उपलब्ध

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरातील गरजू महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने महिला व बाल विकास विभागामार्फत पिंक ई रिक्षा योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. महिलांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना वाहन चालवण्याचा परवाना व प्रवासी वाहतुकीचा परवानगी दिला जाणार आहे.

रिक्षाच्या किंमतीच्या दहा टक्के रक्कम भरून ही रिक्षा उपलब्ध करून दिली जाणार आहे. इच्छुक गरजू महिलांनी पिंक ई रिक्षासाठी महापालिकेत अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

गरजू महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेत राज्य शासनाने पिंक ई रिक्षा योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत अर्ज करणाऱ्या महिलांना रिक्षाच्या किंमतीच्या अवघ्या १० टक्के रकमेत ही रिक्षा उपलब्ध होणार आहे.

उर्वरित रकमेतील ७० टक्के रक्कम बँकांकडून कर्ज स्वरूपात व २० टक्के रक्कम शासन अनुदान स्वरूपात देणार आहे. पात्र महिलांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देऊन वाहन चालवण्याचा परवाना, प्रवासी वाहतूक परवाना उपलब्ध करून दिला जाणार आहे.

अहिल्यानगर शहरात ३०० महिलांना रोजगारासाठी रिक्षा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. इच्छुक महिलांना अर्ज करण्यासाठी महानगरपालिकेत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाशेजारी असलेल्या संकुलातील डे एनयुएलएम विभागाच्या कार्यालयात अर्ज उपलब्ध आहेत.

जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घेऊन अर्ज करावेत, अधिक माहितीसाठी महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी 9730738557 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24