स्पेशल

एलआयसीचा ‘हा’ प्लॅन आहे लयभारी! एकच प्लॅनमध्ये 40 व्या वर्षी मिळेल तुम्हाला पेन्शन आणि कर्ज देखील, वाचा माहिती

Published by
Ajay Patil

आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये स्वतःचा आणि कुटुंबाचा विमा घेणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे आता बरेच व्यक्ती हे कुटुंबासाठी आणि वैयक्तिक विमा योजनांचा लाभ घेताना आपल्याला दिसून येतात. तसेच आजकाल कोरोना कालावधीपासून लोक आरोग्याच्या बाबत देखील सजग झाले आहेत व आरोग्य विमा घेणाऱ्यांच्या संख्येत देखील प्रचंड वाढ झाली आहे.

दुसरे महत्वाची म्हणजे आयुष्याच्या उतारवयामध्ये आपल्याला पैशांच्या बाबतीत कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये याकरिता देखील अनेक व्यक्ती प्रयत्नशील असल्याचे दिसतात व त्या दृष्टिकोनातून गुंतवणूक देखील करत असतात. यासाठी देखील सरकारच्या आणि इतर पेन्शन योजना या खूप फायद्याच्या आहेत.

अशाच प्रकारे तुम्हाला देखील आयुष्याच्या उतारवयामध्ये पैशांची चणचण भासू नये म्हणून कुठे गुंतवणूक करण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी एलआयसी हा एक उत्तम पर्याय ठरेल. एलआयसीचा हा प्लान वैशिष्ट्यपूर्ण असून तुम्हाला आयुष्याच्या उतारवयात चांगले पैसे देऊ शकतो.

या प्लानमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला म्हातारपणी चांगली पेन्शन मिळू शकते. या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला वयाची साठ वर्षे पूर्ण कधी होतील? याची प्रतीक्षा करण्याची गरज नसून वयाच्या 40 व्या वर्षी देखील तुम्हाला पेन्शन मिळू शकते.

एलआयसीचा या महत्त्वपूर्ण प्लॅनचे नाव आहे एलआयसी सरल पेन्शन प्लान होय. या प्लॅनच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आयुष्यातील उतारवयातील कालखंड आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करू शकतात.

 कसा आहे एलआयसीचा सरल पेन्शन प्लान?

एलआयसीच्या माध्यमातून हा एक दिला जाणारा पेन्शन प्लान खूप महत्त्वाचा असून त्याला सरल पेन्शन प्लान असे म्हणतात. या अंतर्गत तुम्ही पॉलिसी जेव्हा घेता तेव्हाच तुम्हाला पेन्शन चालू होते. विशेष म्हणजे तुम्हाला याकरिता फक्त एकदाच प्रीमियम भरावा लागतो व प्रीमियम भरल्यानंतर लगेच तुम्हाला पेन्शन मिळणे चालू होते.

समजा पॉलिसी धारकाचा जर मृत्यू झाला तर त्याने जी काही रक्कम गुंतवलेली असेल ती त्याच्या वारसाला म्हणजेच नॉमिनीला परत केली जाते. तुम्ही वैयक्तिक किंवा तुमच्या जोडीदारासोबत देखील हा प्लॅन घेऊ शकतात. यामध्ये जर तुम्ही सिंगल प्लान घेतला तर पॉलिसीधारक जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत त्याला पेन्शन मिळते.

पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास गुंतवलेली रक्कम परत दिली जाते. याव्यतिरिक्त तुम्ही पती व पत्नीसाठी जॉईंट प्लान घेतला असेल तर प्रायमरी पॉलिसीधारकाला तो जिवंत असेपर्यंत पेन्शन मिळते. प्रायमरी पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास दुसऱ्या जोडीदाराला पेन्शन दिले जाते. दोघांचाही मृत्यू झाला तर ही रक्कम त्याच्या नॉमिनीला मिळते.

 एलआयसीच्या सरल पेन्शन योजना अंतर्गत किती मिळते पेन्शन?

या प्लॅन अंतर्गत तुम्ही एक हजार रुपयांची मासिक पेन्शन देखील घेऊ शकतात व जास्तीत जास्त पेन्शन घेण्यावर कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. यामध्ये फक्त तुम्ही जी रक्कम गुंतवत आहात त्यावर तुम्हाला मिळणारे पेन्शन अवलंबून असते.

यामध्ये तुम्ही मासिक, तीमाही तसेच सहामाही आणि वार्षिक अशा आधारावर पेन्शन घेण्याचा पर्याय निवडू शकतात.

वयाच्या 40 व्या वर्षापासून मिळेल पेन्शनचा फायदा

तुम्ही जर एलआयसीच्या सरल पेन्शन प्लॅन घेतला तर तुम्हाला वयाची साठ वर्षे पूर्ण होण्याची वाट पाहण्याची गरज नसून तुम्ही 40 ते 80 वर्षापर्यंत कधीही या प्लॅनमध्ये गुंतवणूक करून पेन्शनचा लाभ घेऊ शकतात.

तुम्ही जर 40 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक करत असाल तर त्याच वयापासून तुम्हाला पेन्शन मिळणे सुरू होते व तुम्ही जोपर्यंत हयात आहात तोपर्यंत तुम्हाला पेन्शन मिळत राहते.

तसेच एलआयसीच्या माध्यमातून या सरल पेन्शन प्लान वर तुम्हाला कर्ज देखील घेता येऊ शकते. तुम्ही हा प्लॅन घेतल्यानंतर सहा महिन्यांनी तुम्हाला या माध्यमातून कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. तसंच काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर तुम्हाला ही पॉलिसी सरेंडर देखील करता येते.

Ajay Patil