अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- देशाच्या काही भागांमध्ये आता थंडीची लाट सुरु झाली आहे. त्यामुळे या दिवसात कुठे फिरायला कुठे जायचं? याचा शोध घेणं अनेकांनी सुरु केलं असेल.
भारतात तर या दिवसात फिरायला जाण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. पण त्यातल्या त्यात काही खास अशी ठिकाणे आहेत जिथे तुमची सुट्टी तुम्ही अधिक जास्त एन्जॉय करु शकता.
लेह-लडाख हे देशातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपकी एक आहे.
गोकर्णा – कर्नाटकातील गोकर्णा हे ठिकाण देशातील वेगवेगळ्या लोकप्रिय समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे. ही जागा शांततेसाठी आणि एकट्याने वेळ घालवण्यासाठी चांगलीच लोकप्रिय आहे.
ननिताल – प्रसिद्ध ननी तलाव आणि ननी मंदिरावरून हे नाव पडले. ननितालच्या सभोवती सात टेकड्या आहेत.
मनाली (हिमाचल प्रदेश) हे सर्वच भारतीयांचं आवडतं पर्यटनस्थळ. सरत्या हिवाळ्यात काही प्रमाणात बर्फाच्छादित डोंगर आणि मानवणाऱ्या थंडीचा आनंद घेता येत असल्यामुळे पर्यटकांची गर्दी होते.
दार्जिलिंग – पश्चिम बंगालमधील हिमालयाच्या पायथ्याशी असलेले दार्जिलिंग शहर. अचानक समोरुन येणारे धुके, शीळ घालत मनमोहकपणे वळणे घेत जाणारी वाफेच्या इंजिनावर चालणारी हिमालयन टॉय ट्रेन हे दार्जिलिंगचे खास आकर्षण.
शिलाँग (मेघालया) – नेहमीची लोकप्रिय ठिकाणं सोडून वेगळं काही अनुभवायचं असेल तर पूर्वेकडची राज्यं हा एकदम खासा पर्याय आहे. इथला निसर्ग वेगळा, इथली माणसं वेगळी आणि त्यामुळे इथले अनुभवही एकदम वेगळे!
दिव -दमण – हिवाळ्यात फिरायला जाण्यासाठी गुजरातमधील बेस्ट ठिकाण दमण आणि दीव मानलं जातं. सुंदर बीच आणि थंडीचं मनमोहक वातावरण या ठिकाणी असतं. मुंबईपासुन फार लांब नसलेले हे ठिकाण अत्यंत सुंदर आहे.