अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- जॅक डॉर्सी यांनी राजीनामा दिल्यानंतर आता ट्विटरच्या सीईओ पदी मुंबईचे पराग अग्रवाल यांची नियुक्ती झाली आहे.
अग्रवाल यांनी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून ट्विटरमध्ये कामाला सुरुवात केली होती. कंपनीचे माजी सीईओ जॅक डॉर्सी हे पहिल्यापासून अग्रवाल यांच्या कामामुळे प्रभावित होते.
त्यामुळे त्यांना आता सीईओपदाची जबाबदारी मिळाली. अग्रवाल ट्विटरचे सीईओ बनताच ते समाज माध्यंमावर ट्रेंड झाले. अनेकांना त्यांना ट्विटर आता किती वेतन देणार याबाबतची उत्सुकता असल्याचे पहायला मिळाली.
भारतामध्ये जन्मलेल्या पराग अग्रवाल यांना कंपनीकडून तब्बल एक मिलियन डॉलर म्हणजेच साडेसात कोटी रुपये वेतन मिळणार आहे.
दरम्यान त्यांच्या वेतनाबाबत वेगवेगळ्या वृत्तपत्राकडून वेगवेगळी माहिती समोर येत आहेत. दरम्यान ट्विटरच्या सीईओपदी नियुक्ती झाल्यानंतर पराग अग्रवाल यांनी ट्विटरवर जॅक डॉर्सी यांचे आभार मानले आहेत.
अग्रवाल यांची एकूण संपत्ती अंदाजे 1.52 मिलिअन डॉलर म्हणजेच 11 कोटी 41 लाख 91 हजार 596 रुपये असल्याचे सांगितले जात आहे.