Tourist Places In India:- भारत हा पर्यटन स्थळांच्या दृष्टिकोनातून खूप समृद्ध असा देश असून भारताच्या उत्तरेपासून तर दक्षिणेकडील व पूर्वेपासून ते पश्चिमेकडील असलेल्या प्रत्येक राज्यांमध्ये आपल्याला पर्यटन स्थळे दिसून येतात.
भारताला निसर्गाने खूप सढळ हाताने भरभरून अशी नैसर्गिक साधन संपत्ती दिली आहे व या माध्यमातूनच अनेक अर्थांनी समृद्ध असलेली पर्यटन स्थळे भारतात आहेत. त्यामुळे वर्षाला देशातूनच नव्हे तर परदेशातील लाखोंच्या संख्येने पर्यटक भारताला भेट देत असतात.
अगदी तुम्ही बाराही महिन्यातील कुठल्याही कालावधीत फिरायला जायचे ठरवले तरी देखील तुम्हाला त्या त्या कालावधीत उत्तम ठरतील अशी पर्यटन स्थळे भारतात दिसून येतात.
त्यामुळे तुम्हाला देखील या आता थंडीची चाहूल लागेल अशा नोव्हेंबर महिन्यामध्ये कुटुंब किंवा मित्रांसोबत कुठे फिरायला जायचा प्लान बनवायचा असेल तर तुम्ही या लेखात सांगितलेल्या भारतातील या ठिकाणांना भेट देऊ शकतात.
विशेष म्हणजे फॉरेनमध्ये असलेल्या काही पर्यटन स्थळापेक्षा ही भारतातील ठिकाणी कुठल्याही तुलनेने कमी नाहीत.या ठिकाणी तुम्ही कुठल्याही ऋतूमध्ये भेट दिली तरी देखील ही ठिकाणे एक उत्तम टुरिस्ट डेस्टिनेशन आहेत.
नोव्हेंबर महिन्यात फिरण्यासाठी हे ठिकाणे आहेत बेस्ट ऑप्शन
1- कुर्ग– हे ठिकाण कर्नाटक राज्यात असून याला दक्षिण भारतातील काश्मीर असे देखील म्हटले जाते व भारताचे स्कॉटलंड म्हणून देखील कुर्गला ओळखले जाते. या शहराला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर नोव्हेंबर महिना हा त्यासाठी योग्य कालावधी आहे.
हे एक सुंदर असे छोटेसे हिल स्टेशन असून या ठिकाणी असलेली हिरवाई आणि निसर्गाचे अद्भुत सौंदर्य तुमच्या मनाला मोहून टाकते. तुम्हाला जर दररोजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या आयुष्यातून काही काळ शांततेत घालवायचा असेल तर कुर्ग हे ठिकाण त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. इतकेच नाही तर तुम्हाला जर ट्रेकिंगची हौस असेल तर तुमच्या करीता हे ठिकाण उत्तम ठरेल.
2- उज्जैन– हे मध्य प्रदेश राज्यातील शहर असून नोव्हेंबरमध्ये जर तुम्ही मध्य प्रदेश राज्याची सहल आयोजित केली असेल तर तुम्ही उज्जैनला भेट देणे गरजेचे आहे. हे एक धार्मिक स्थळ असून या ठिकाणी भेट दिल्यानंतर तुमचे नैसर्गिक व आध्यात्मिक अशा दोन्ही स्वरूपाचे पर्यटन एकाच वेळी होऊ शकते.
उज्जैनला गेलात तर तुम्ही महाकालेश्वर मंदिराला भेट देऊ शकतात व हे या शहरातील सर्वात मोठे आकर्षण आहे. या ठिकाणी असलेले तलाव देखील पाहण्यासारखे आहेत.
3- जैसलमेर– हे राजस्थान राज्यातील एक शहर असून अनेक पर्यटक राजस्थान राज्याला भेट देतात. नोव्हेंबर महिना हा राजस्थान राज्याला भेट देण्यासाठी योग्य महिना असून तुम्ही जैसलमेरला या कालावधीत भेट देऊ शकतात.
जैसलमेरला असलेल्या स्थानिक बाजारपेठ तसेच त्या ठिकाणी असलेली राजवाडे व किल्ले यासारखे राजेशाही स्वागत तुमचे मन मोहून टाकते. विशेष म्हणजे नोव्हेंबरमध्ये या ठिकाणाची वाळू थंड राहते. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही उष्णतेची चिंता न करता वाळवंटात फिरण्याचा आनंद घेता येतो.
4- मनाली– तुम्हाला जर डोंगराळ आणि बर्फाळ ठिकाणाला भेट द्यायची इच्छा असेल तर नोव्हेंबर महिना त्यासाठी योग्य असून या कालावधीत जास्त बर्फवृष्टी होत नसल्यामुळे तुम्ही सहजतेने पर्यटनाचा आनंद घेऊ शकता.
तुम्हाला जर डोंगराळ आणि बर्फाळ ठिकाणाला जायचे असेल तर तुमच्याकरिता हिमाचल प्रदेशातील सुंदर हिल स्टेशन मनाली बेस्ट ऑप्शन आहे.
पाईनच्या जंगलांनी वेढलेल्या मनालीला नोव्हेंबर महिन्यामध्ये एक वेगळे सौंदर्य चढते. तुम्हाला जर कमीत कमी खर्चामध्ये ट्रिप प्लॅन करायची असेल तर तुमच्याकरिता मनाली हे पर्यटन स्थळ बेस्ट ऑप्शन आहे.