तुमचा लग्नसोहळा होणार शाही थाटात, फक्त ‘एवढे’ पैसे खर्च करून लग्नासाठी हेलिकॉप्टर बुक करता येणार, पहा…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Helicopter On Rent For Marriage : लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग असतो. यामुळे प्रत्येकजण लग्न सोहळा कायम आठवणीत राहील असा बनवण्याचा प्रयत्न करतात. अनेकजण सुंदर वेडिंग डेस्टिनेशनवर लग्न करतात. यासाठी लाखो, करोडो रुपयांचा खर्च केला जातो. लग्नसोहळा शाही थाटात पार पडला पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा असते. 

अनेकजण लग्न एकदाच होतं, यामुळे असं लग्नकार्य निघायला पाहिजे की येणाऱ्या पिढ्यांनी देखील त्याची आठवण काढली पाहिजे असे म्हणतात. दरम्यान जर तुम्हालाही तुमचा लग्न सोहळा किंवा तुमच्या प्रियजनांचा लग्न सोहळा शाहीथाटात पार पाडायचा असेल तर तुम्ही यासाठी हेलिकॉप्टर बुक करायला काही हरकत नाही. कारण की आता लग्नासाठी हेलिकॉप्टर बुक करणे खूपच सोपे झाले आहे.

कार बुक करणे आणि हेलिकॉप्टर बुक करणे जवळपास सारखेच आहे. खरेतर अलीकडे नववधूला नेण्यासाठी नवरदेव हेलिकॉप्टरने सुद्धा जातात. लग्नासाठी कारने जाण्याऐवजी आता हेलिकॉप्टरने जातात. नवरदेवाची इंट्री हेलिकॉप्टरने झाली पाहिजे अशी कोणाची इच्छा असेल तर आज आपण लग्न समारंभासाठी हेलिकॉप्टर बुक करायला किती खर्च येऊ शकतो याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

लग्नासाठी हेलिकॉप्टर बुक करायला किती खर्च येतो

अलीकडे लग्नसमारंभासाठी हेलिकॉप्टर बुक करण्याचा ट्रेंड वाढू लागला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये अशा बातम्या सातत्याने पाहायला देखील मिळतात. दरम्यान देशातील बहुतेक विमान कंपन्यांनी आता लग्नसमारंभासाठी हेलिकॉप्टरचे पॅकेज तयार केलेले आहे. यानुसार लग्नसमारंभासाठी जर हेलिकॉप्टर हवे असेल तर चार लाखांपासून ते दहा लाखांपर्यंतचा खर्च येऊ शकतो.

लग्नाच्या स्थानाचे अंतर आणि हेलिकॉप्टरची आसनक्षमता यानुसार हे पॅकेजेस असतात. जर हेलिकॉप्टर लग्न समारंभाऐवजी दुसऱ्या कार्यक्रमासाठी आवश्यक असेल तर विमान कंपन्यांच्या माध्यमातून प्रति तास प्रमाणे पैसे आकारले जातात. पण लग्न समारंभासाठी मात्र कंपन्यांनी हेलिकॉप्टर बुकिंगचे पॅकेज तयार केलेले आहेत. दरम्यान याबाबत अधिक माहिती देताना बद्री हेलिकॉप्टर चालवणाऱ्या प्रवीण जैन यांनी मोठी माहिती दिली आहे.

जैन यांनी म्हटल्याप्रमाणे, त्यांची कंपनी दिल्ली-एनसीआर आणि हरियाणा मध्ये पाच सीटर हेलिकॉप्टर साडेचार लाखांमध्ये लग्न समारंभासाठी उपलब्ध करून देत आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेश मधील लखनऊ व आजूबाजूच्या परिसरात लग्न समारंभासाठी सहा लाखांमध्ये हेलिकॉप्टर उपलब्ध होते. जर समजा पंजाब मधील जालंधर किंवा अमृतसर या भागातून वधूला दिल्लीत आणायचे असेल तर यासाठी जवळपास पाच लाख रुपयांत हेलिकॉप्टर बुक होऊ शकते.

दुसरीकडे उत्तर प्रदेश मधील बनारस ते दिल्ली यासाठी हेलिकॉप्टरचे भाडे नऊ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. मात्र लग्न समारंभासाठी जे पॅकेज असते त्या अंतर्गत फक्त दोन तासांसाठी हेलिकॉप्टर उपलब्ध होते. जर या कालावधीपेक्षा अधिकचा वेळ लागला तर पैसे वाढतात. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे आणि विशेष बाब अशी की, हेलिकॉप्टर लँडिंग आणि टेकऑफसाठी जी परवानगी लागते ती परवानगी हेलिकॉप्टर चालक स्वतः घेतात.

यामुळे लग्न समारंभाच्या गडबडीत असणाऱ्यांना यासाठी कुठेच विचारपूस करण्याची गरज नसते, किंवा कोणत्याच कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नसते. हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी जागा तयार करणे व इतर आवश्यक कामे देखील हेलिकॉप्टर ऑपरेटर कंपन्यांकडून केले जाते. म्हणजेच लग्न समारंभासाठी ज्याप्रमाणे कार बुक केली जाते त्याच धर्तीवर हेलिकॉप्टर देखील बुक करता येऊ शकते.