Zomato Share Price : जर तुमच्याकडे झोमॅटोचे शेअर्स असतील तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. गेल्या तीन दिवसांपासून झोमॅटच्या शेअरमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या शेअरने आज 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. 12 एप्रिल 2023 रोजी कंपनीचा शेअर 53.20 रुपयांवर होता. कंपनीने सहा महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. झोमॅटोच्या शेअर्सची 52 आठवड्यांची विक्रमी पातळी 113.25 रुपये आहे.
एका महिन्यात १३ टक्के परतावा
गेल्या महिन्याभरात झोमॅटोच्या शेअरमध्ये 13.06 टक्के वाढ झाली आहे. या कालावधीत हा शेअर 12.90 रुपयांनी वधारला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने सहा महिन्यांपूर्वी झोमॅटोचे शेअर्स खरेदी केले असते तर आज त्याचे पैसे दुप्पट झाले असते.
झोमॅटोने सहा महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले
गेल्या सहा महिन्यांत झोमॅटोचा शेअर 109.87 टक्के म्हणजेच 58.45 रुपयांनी वधारला आहे. आज हा शेअर 111.65 रुपयांवर ट्रेड करत आहे.
किती असू शकतो रेवेन्यू
झोमॅटोसाठी आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांनी 160 रुपये लक्ष्य ठेवले आहे. अन्न वितरण व्यवसायातून कंपनीला चांगले उत्पन्न मिळणार आहे. कंपनीला आर्थिक वर्ष 2024 मध्ये 25 टक्के, 2025 मध्ये 26 टक्के आणि 2026 मध्ये 20 टक्के महसूल अपेक्षित आहे.
तज्ज्ञांचे मत काय आहे?
डीआरएस फिनइन्व्हेस्टचे संस्थापक रवी सिंह यांनी सांगितले की, झोमॅटोच्या शेअरच्या किमतीने 80-100 रुपयांचा टप्पा ओलांडून तेजीच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. येत्या ट्रेडिंग सेशन्समध्ये त्यात आणखी वाढ होऊन तो 120 रुपयांच्या पातळीवर पोहोचू शकतो. आर्थिक वर्ष 2024 च्या दुसऱ्या तिमाहीतील आकडेवारी शेअरला दिशा देईल.