क्रीडा

मोठी बातमी ! टीम इंडिया अन इंग्लंडमध्ये ‘या’ तारखेपासून सुरु टी-20 मालिका, कस असणार संपूर्ण वेळापत्रक?

Published by
Ahmednagarlive24 Office

India Vs England T20 Timetable : टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका सुरु आहे. आज या मालिकेतील चौथ्या सामन्याचा शेवटचा म्हणजे पाचवा दिवस.

बॉक्सिंग डे चा हा सामना आता निर्णायक वळणावर आला आहे. दरम्यान ही कसोटी मालिका 7 जानेवारीला संपणार आहे. या कसोटी मालिकेनंतर इंग्लंडचा संघ भारतात येणार आहे. इंग्लंडचा संघ भारतासोबत 5 T-20 अन तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. आधी भारत आणि इंग्लंड यांच्यात t20 मालिका होईल आणि त्यानंतर एक दिवसीय मालिका होणार आहे.

टीम इंडिया 22 जानेवारीपासून मायदेशात इंग्लंडसोबत टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 जानेवारीला होईल आणि शेवटचा सामना 2 फेब्रुवारी 2025 ला होणार आहे. दुसरीकडे एक दिवसीय मालिकेतील पहिला सामना 6 फेब्रुवारीला होणार आहे आणि शेवटचा सामना 12 फेब्रुवारीला होणार आहे.

अशा परिस्थितीत आता आपण मायदेशात खेळवल्या जाणाऱ्या या टी ट्वेंटी आणि एक दिवसीय मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड t20 मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक 22 जानेवारी 2025 ला भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पहिला टी ट्वेंटी सामना होणार आहे, हा सामना कोलकत्ता येथील ईडन गार्डन या मैदानावर होणार आहे.

25 जानेवारी 2025 ला या मालिकेतील दुसरा t20 सामना होणार आहे, हा सामना चेन्नई येथील एम ए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. 28 जानेवारी 2025 ला या मालिकेतील तिसरा t20 सामना होणार आहे, हा सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम या मैदानावर होईल. 31 जानेवारी 2025 ला या मालिकेतील चौथा t20 सामना होणार आहे, हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम वर खेळवला जाणार आहे.

2 फेब्रुवारी 2025 ला या मालिकेतील पाचवा टी-20 सामना होणार आहे, हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड एक दिवसीय मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना हा 6 फेब्रुवारी 2025 ला नागपूर येथील क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. दुसरा वनडे सामना 9 फेब्रुवारी 2025 ला कटक येथील क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. तिसरा सामना 12 फेब्रुवारी 2025 ला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे

Ahmednagarlive24 Office