चेन्नई सुपर किंग्स यंदाच बदलणार आपला कॅप्टन; धोनी नंतर हा असेल कॅप्टन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-  भारतीय किर्केट संघाचा सर्वात यशस्वी माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यातले नाते सुरुवातीपासून असल्याचे दिसते. आयपीएल खेळाची सुरुवात धोनी ने सीएसके सोबत केली होती.

धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसके ने २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ असे चार विजेतेपद पटकावले आहे. आगामी ‘आयपीएल’ स्पर्धेची तयारी आता सुरू झालीय. पुढील महिन्यात ‘मेगा ऑक्शन होणार असून, त्यानंतर सगळ्या टीमचे चित्र स्पष्ट होईल. सध्या सर्व टीम ‘ऑक्शन’च्या तयारीला लागल्या आहेत.

‘सीएसके’ने यंदा धोनीला रिटेन केले, मात्र खुद्द धोनीने मानाचे पान आपला सहकारी व अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा याला दिले. रिटेनमध्ये धोनीने दुसरे स्थान स्वीकारताना जाडेजाला पहिल्या स्थानी बसविले. मात्र, कॅप्टन म्हणून धोनीच राहणार असल्याचा अंदाज आहे.

काही मीडिया रिपोर्टनुसार या सिझनमध्ये ‘सीएसके’चा कॅप्टन बदलला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सीएसकेचा ऑल राऊंडर रविंद्र जडेजा या सिझनमध्येच सीएसकेचा कॅप्टन होईल असा अंदाज आहे. जडेजाला सीएसकेने धोनीपेक्षा जास्त किंमत देऊन रिटेन केले आहे.

राजस्थान रॉयल्सनं आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या सिझनचे विजेतेपद पटाकावले होते. त्या विजेतेपदामध्ये जडेजाचे मोलाचे योगदान होते. तो गेल्या 10 वर्षांपासून सीएसके टीमचा सदस्य आहे. त्याने सीएसकेकडून दोन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली असून तो टीमचा मुख्य ऑल राऊंडर आहे.

दरम्यान धोनी याच सिझनपासून त्याला कॅप्टनसीची जबाबदारी देईल असा अंदाज आहे. धोनी संपूर्ण सिझन खेळणार, की चेन्नईमधील एक दोन सामने खेळून निवृत्त होणार हे अद्याप समजलेले नाही. मात्र पुढील 10 वर्षांचा विचार करुन आता टीमची उभारणी करावी लागणार आहे,

असे वक्तव्य धोनीने आयपीएल विजेतेपदानंतर केले होते. त्यामुळेच भविष्याचा विचार करून सीएसके मॅनेजमेंट याच सिझनमध्ये धोनीच्या उपस्थितीत जडेजाला कॅप्टन करू शकते अशी सध्या क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे.