ख्रिस गेलचे भाकीत, वर्ल्ड कप 2023 ची सेमीफायनल या 4 संघांमध्ये होणार, हा भारतीय खेळाडू करेल सर्वाधिक धावा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

World Cup 2023 : यावर्षी एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन भारत करणार आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेच्या तयारीत सर्व संघ व्यस्त आहेत. त्याचबरोबर क्रिकेटचे दिग्गज या स्पर्धेबद्दल सातत्याने बोलत आहेत.

आता याच क्रमवारीत वेस्ट इंडिजचा सलामीवीर ख्रिस गेलनेही एकदिवसीय विश्वचषकाबाबत मोठी भविष्यवाणी केली असून या स्पर्धेतील उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या ४ संघांबद्दल सांगितले आहे.

उपांत्य फेरीतील चार संघ

गेलने त्या चार संघांबद्दल सांगितले. जे एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करेल. खेळाडूने संभाषणात म्हटले आहे की, ख्रिस गेलला कोणते चार संघ वर्ल्डकप सेमीफायनल पर्यंत पोहचतील असे विचारल्यावर गेल म्हणाला की हा खूप अवघड प्रश्न आहे. मात्र मला वाटते की भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे चार संघ सेमी फायनलमध्ये पोहचतील.

“भारत – अगदी वेस्ट इंडिजने 2016 पासून आयसीसीचे विजेतेपद जिंकलेले नाही. भारताकडे सर्वोत्तम खेळाडू आहेत आणि त्यांना त्यांच्या भूमीवर खेळण्याचा फायदाही मिळेल. पण भारतीय संघावर विजेतेपदासाठीही दडपण असेल कारण भारतीय संघाने आपल्या भूमीवर विजय मिळवावा अशी भारतातील प्रत्येकाची इच्छा आहे.

विराट कोहलीबद्दल मोठी चर्चा

ख्रिस गेलच्या मते विराट कोहली मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत आहे. त्यामुळे भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये त्याचा दबदबा राहील. वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू ख्रिस गेलने एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा विराट कोहलीच असू शकतो असे सांगितले आहे.