Cricket World Cup :- आयसीसीने वन डे विश्वचषकासाठी असणारा उपांत्य सामना व अंतिम सामन्या करिता शनिवारी प्लेइंग कंडिशनची घोषणा केली असून याकरिता राखीव दिवस देखील जाहीर करण्यात आलेला आहे.
म्हणजे जर पावसामुळे सामन्यांमध्ये काही अडसर निर्माण झाला तर या राखीव दिवसाचा विचार केला जाणार आहे. पाऊस आला तर निश्चित वेळापत्रकानुसार जो काही सामना आयोजित करण्यात आलेला आहे तो या रिझर्व म्हणजेच राखीव दिवसाला शिफ्ट केला जाणार आहे.
परंतु यामध्ये पंचांचा निर्णय हा खूप महत्त्वाचा राहणार आहे. तसेच वीस ओव्हरचा सामना आयोजित केला जाऊ शकणार आहे. यामध्ये भारताने सलग आठ सामने जिंकलेले असून अशामध्ये जर पावसाचा व्यत्यय निर्माण झाला तर सामना होऊ शकल्यास भारताला खूप मोठा फायदा होणार आहे.
यामध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड कप मधील पहिला सेमी फायनल चा सामना होणार असून नेमका हा सामना किती तारखेला आणि कुठे खेळला जाणार आहे याबद्दलची माहिती या लेखात घेणार आहोत.
न्यूझीलंड आणि भारतमधील सेमी फायनल कधी आणि कुठे होणार?
या स्पर्धेमध्ये न्युझीलँड संघाने चांगली कामगिरी करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला असून या अगोदर जर भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांचा विश्वचषकातील खेळ पाहिला तर एक 2019 मध्ये इंग्लंडमध्ये जो काही विश्वचषक झालेला होता तेव्हा हे दोनही संघ समोरासमोर आलेले होते
व विशेष म्हणजे त्यावेळी न्यूझीलंड कडून भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. याच पराभवाचा वचपा आता भारतीय संघ काढेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत भारताची विजयी वाटचाल सुरू असून या सामन्यामध्ये जर भारताला धक्का बसला तर आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता आहे व त्यामुळे थेट स्पर्धेबाहेर देखील जावे लागू शकते.
त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा ठरणार आहे. या वर्ल्डकप मध्ये जे काही साखळी फेरी झाली होती त्यामध्ये भारताने न्युझीलंड वर विजय मिळवला होता.
आतापर्यंतच्या वर्ल्डकप मध्ये न्युझीलंड या संघाने भारताला कडवी झुंज दिली असून न्यूझीलंडचा कॅन विल्यम्सन हा खेळाडू मात्र तेव्हा नव्हता कारण तो दुखापतीमुळे बाहेर होता. परंतु आता मात्र तो न्यूझीलंड संघात असणार आहे त्यामुळे भारतासाठी मोठे आव्हान ठरू शकते.
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान चा हा सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर होणार आहे. 15 नोव्हेंबरला या दोन्ही संघांदरम्यानचा सेमी फायनलचा सामना खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे आता भारत 2019 मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.