क्रीडा

बिग ब्रेकिंग : महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न यांचे निधन !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

क्रिकेट विश्वासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील महान गोलंदाज शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले आहे. शेन वॉर्न त्याच्या घरात मृतावस्थेत आढळले होते.

जगातील महान फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्न यांचे थोड्या वेळापूर्वी निधन झाले आहे.

शेन वॉर्नच्या व्यवस्थापनाने एका निवेदनात पुष्टी केली आहे की शेन त्याच्या व्हिलामध्ये मृतावस्थेत आढळला होता आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही तो जिवंत झाला नाही.

वॉर्नच्या मॅनेजमेंट टीमनेही एक स्टेटमेंट काढून याबाबत माहिती दिल्याचे समजते आहे. वॉर्न थायलंड येथे होता आणि तेथे त्याला हार्ट अटॅक आल्याचे सांगण्यात येत आहे.

शेन त्याच्या व्हिलामध्ये प्रतिसाद देत नसल्याचे आढळले आणि वैद्यकीय कर्मचा-यांच्या सर्वोत्तम प्रयत्नानंतरही त्याला पुनरुज्जीवित करता आले नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

कसोटी क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून निवृत्त झाल्यानंतर, वॉर्नला क्रिकेट खेळणाऱ्या महान गोलंदाजांपैकी एक म्हणून ओळखले जाते.

दरम्यान, भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सहवागने याबाबत ट्विट दुःख व्यक्त केलं आहे. त्याने लिहिलं आहे की, “विश्वासच बसत नाही.

महान फिरकीपटूंपैकी एक, फिरकीला कूल बनवणारा, सुपरस्टार शेन वॉर्न राहिला नाही. जीवन खूप नाजूक आहे, परंतु हे समजणे फार कठीण आहे. त्याचं कुटुंब, मित्र आणि जगभरातील चाहत्यांसाठी माझ्या मनःपूर्वक संवेदना.”

Former Australian Cricketer Shane Warne Passes Away

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24