GT vs CSK : IPL च्या सोळाव्या हंगामातील बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित सामना आज चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात पार पडणार आहे. दरम्यान सर्व क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलेल्या या सामन्यावर पावसाचे संकट आल्याचे पाहायला मिळत आहे.
चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यादरम्यान पावसाची शक्यता सामना सुरु होण्यापूर्वी वर्तवली होती. जर हा सामना पावसामुळे झालाच नाही तर ट्रॉफी कोणाला मिळणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी अहमदाबादमध्ये जोरदार पाऊस झाला असल्याने पावसामुळे नाणेफेकीलादेखीर उशीर झाला आहे. एका रिपोर्टनुसार, रविवारी संध्याकाळी अहमदाबादमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. अहमदाबाद येथे एकूण 2 तास पाऊस अपेक्षित होता. तसेच संध्याकाळी सूर्यास्तानंतर ताशी 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
राखीव दिवस असणार?
दरम्यान हे लक्षात घ्या की आयपीएल 2022 मध्ये अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस होता, अशातच यंदाही अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. अंतिम सामना संध्याकाळी 7.30 पासून सुरू होणार असून जर या वेळेत पाऊस पडला तर 09.35 पर्यंत खेळ सुरू झाल्यास षटकांमध्ये कोणतीही घट होणार नाही. तसेच यानंतरही, जर हवामानाने फटका दिला तर 5-5 षटकांच्या सामन्यासाठी कट ऑफ वेळ 11.56 पर्यंत असणार आहे.
एकही चेंडू न टाकल्यास काय होईल?
आज कमीत कमी पाच षटकांचा सामना खेळला गेला नाही, तर सामना राखीव दिवशी म्हणजे 29 मे ला होणार आहे. समजा राखीव दिवसातही निर्णय झाला नाही, तर गुजरात टायटन्सचा संघ विजेतेपद पटकावणार होता. कारण गुजरात टायटन्सने पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले असून चेन्नई सुपर किंग्सने दुसरे स्थान पटकावले आहे. अशातच एकीकडे गुजरातने 14 पैकी 10 सामने जिंकले आणि 20 गुण मिळवले तसेच त्यांचा 0.809 चा नेट-रन रेट होता. तर दुसरीकडे, सीएसकेने 14 पैकी 8 सामने जिंकले होते आणि त्यांचे 17 गुण होते.
हे प्लेऑफचे नियम
आयपीएल खेळण्याच्या परिस्थितीनुसार, फायनल, एलिमिनेटर, क्वालिफायर-1, क्वालिफायर-2 सामना टाय राहिला तर आणि निकाल लागला नाही तर हे नियम लागू होणार आहेत.
16.11.1: अंतिम फेरीतील विजेता ठरवण्यासाठी संघ सुपर ओव्हरमध्ये एकमेकांशी खेळतील
16.11.2: सामन्यात सुपर ओव्हर शक्य नसेल, आयपीएलच्या खेळण्याच्या परिस्थितीच्या परिशिष्ट एफ अंतर्गत विजेता निश्चित करण्यात येणार आहे. परिशिष्ट एफ नुसार, लीग टप्प्यात गुणतालिकेत जो संघ अव्वल असतो तो विजेता घोषित करण्यात येतो.
गुजरात टायटन्स संघ:
ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल, श्रीकर भारत, शिवम मावी, ओडियन स्मिथ, आर. साई किशोर, प्रदीप सांगवान, मॅथ्यू वेड, जयंत यादव, दासून शनाका, अभिनव मनोहर, अल्झारी जोसेफ, दर्शन नळकांडे, उर्विल पटेल, यश दयाल.
चेन्नई सुपर किंग्जचा संघ:
ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, शिवम दुबे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, एमएस धोनी (कर्णधार/विकेटकीपर), रवींद्र जडेजा, दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश तिक्ष्ण, मथिशा पाथिराना, मिचेल सॅन्थू सेनापती, शेख रशीद, आकाश सिंग, बेन स्टोक्स, ड्वेन प्रिटोरियस, सिसांडा मगाला, अजय यादव मंडल, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंग, राजवर्धन सिंग हंगरगेकर, भगत वर्मा, निशांत सिंधू.