आयसीसी विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. भारतीय संघ दोन वेळा विश्वविजेता आहे. 2011 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने शेवटचा विश्वचषक जिंकला होता. ऑस्ट्रेलियाने 5 वेळा विश्वचषक जिंकला आहे.
याआधी वर्ल्ड कप फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ 2003 मध्ये आमनेसामने आले होते. त्यानंतर भारताला 125 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. आता भारताला तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचीच नाही तर २० वर्ष जुन्या पराभवाचा बदला घेण्याचीही संधी आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २०२३ च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या उपांत्य फेरीत भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करून अंतिम फेरीतील आपले स्थान आधीच पक्के केले होते. आता 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कधी आहे.
ICC विश्वचषक 2023 अंतिम सामना किती वाजता सुरू होईल?
अंतिम सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होईल.
ICC विश्वचषक 2023 चा अंतिम सामना कोणत्या मैदानावर खेळवला जाईल?
वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
ICC विश्वचषक 2023 अंतिम सामना कोणत्या टीव्ही चॅनेलवर पाहता येणार ?
हा सामना स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 HD आणि स्टार स्पोर्ट्स 1 हिंदीवर थेट प्रसारित केला जाईल.
ICC विश्वचषक 2023 अंतिम सामना मोबाईल वर कसा पहायचा ?
ICC विश्वचषक 2023 अंतिम सामन्याचे थेट प्रसारण Disney+Hotstar अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.
ICC विश्वचषक २०२३ ची अंतिम सामना फुकट कसा पाहायचा ?
डिस्ने+हॉटस्टार अॅपवर फायनल मॅच म्हणजेच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना विनामूल्य लाइव्हस्ट्रीम करू शकतात.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचे लाइव्ह-स्ट्रीमिंग भारताव्यतिरिक्त परदेशात विनामूल्य कसे पहावे?
भारत: Disney+Hotstar अॅप आणि वेबसाइट
ऑस्ट्रेलिया: 9 नाऊ आणि फॉक्स स्पोर्ट्स
यूएस आणि कॅनडा: ESPN+
यूके: स्काय स्पोर्ट्स आणि माय5
न्यूझीलंड: स्काय स्पोर्ट्स आणि स्काय गो
पाकिस्तान: पीटीव्ही स्पोर्ट्स