क्रीडा

विश्वचषक २०२३ आधीच होणार भारत-पाकिस्तानचा सामना ! वाचा कोणता आहे तो दिवस

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

एकदिवसीय विश्वचषक भारतीय भूमीवर खेळवला जाणार आहे, ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असतील. ऑक्टोबर महिन्यात म्हणजे आतापासून तीन महिन्यांनी विश्वचषक सुरू होईल. तीन महिने खूप मोठा कालावधी आहे पण त्यापूर्वी तुम्हाला भारत-पाकिस्तान सामना पाहायला मिळेल.

आशिया चषक एकदिवसीय फॉर्मेटमध्ये !
आशियाई क्रिकेट परिषदेने एक गोष्ट चांगली केली आहे की त्यांनी वेळेनुसार फॉर्मेट निवडला आहे. गेल्या वर्षी जेव्हा टी-20 विश्वचषक होणार होता, तेव्हा आशिया चषक टी-20 फॉरमॅटमध्ये आयोजित करण्यात आला होता. आता एकदिवसीय विश्वचषक तोंडावर असल्याने यावेळी आशिया चषकही ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे.

आतापर्यंत झालेल्या सामान्यांतील रेकॉर्ड्स
आशिया चषकादरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात या दोन संघांमध्ये आतापर्यंत एकूण 14 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारताने 7 सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने पाच सामने जिंकले असले तरी दोन सामन्यांचा निकाल लागलेला नाही. भारताने 7 वेळा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले आहे, तर पाकिस्तानने केवळ दोन वेळा विजेतेपद पटकावले आहे.

आशिया कपमध्ये भारत-पाक आमनेसामने येणार आहेत
आत्तापर्यंतच्या रिपोर्ट्समध्ये असे कळले आहे की 31 ऑगस्टपासून आशिया कप हायब्रीड मॉडेल अंतर्गत खेळवला जाईल. यामध्ये पहिले चार सामने पाकिस्तानमध्ये आणि उर्वरित सामने श्रीलंकेच्या भूमीवर खेळवले जातील.

ह्या दिवशी होणार भारत – पाक सामना
अंदाजानुसार 3 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ श्रीलंकेतील मैदानावर भिडू शकतात. तसेच भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असल्याने ते पुन्हा एकदा सुपर-4 किंवा अंतिम फेरीत आमनेसामने येऊ शकतात.

ह्या बातम्या वाचल्या का ?

अहमदनगर लाईव्ह 24