वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका भारताने 3-0 ने खिशात घातली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या वनडे मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडीजला ३-० अशी धूळ चारली आहे. तिसऱ्या वनडेत भारताने वेस्ट इंडिजला ९६ धावांनी पराभूत केले.

सर्वप्रथम या सामन्यात रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ५० षटकात भारतीय संघाचा डाव २६५ धावांवर आटोपला. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी अर्धशतके ठोकली.

प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजचा संघ १६९ धावांपर्यंतच पोहोचू शकला. प्रसिध कृष्णा, दीपक चहर आणि मोहम्मद सिराज या भारताच्या वेगवान त्रिकुटाने जबरदस्त गोलंदाजी करत सामना भारताच्या बाजूने झुकवला.

श्रेयस अय्यरला सामनावीर, तर प्रसिध कृष्णाला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. भारताने ९६ धावांनी दणदणीत विजय नोंदवत वनडे मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले.

या सामन्यात भारताकडून प्रसिध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. तर कुलदीप यादव आणि दीपक चहर यांना प्रत्येकी २ बळी मिळाले.