लवकरच टी-२० वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. येत्या १ जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे हे सामने रंगणार आहेत. त्यादृष्टीने आज टीम निवडण्यात आली. भारतीय संघाची घोषणा आता करण्यात आली असून 15 शिलेदारांची घोषणा करण्यात आलीये.
भारताच्या निवड समितीने यावेळी अनेक मोठे निर्णय घेतले असल्याचे पाहायला मिळत आहे. रोहित शर्मावरच निवड समितीने विश्वास कायम ठेवला असून त्यालाच कर्णधार केले आहे. हार्दिक पंड्याच्या नावाची चर्चा आता संपली आहे. त्याच्याकडे उपकर्णधारपद देम्यात आले आहे.
ऋषभ पंत आणि संजू सॅमसन भारतीय संघाचे विकेटकीपर असून केएल राहुल याचा पत्ता कट करण्यात आला आहे. तो या वर्ल्डकप मध्ये दिसणार नाही. जसप्रीत बुमराह, सिराज आणि अर्शदीप सिंह हे वेगवान गोलंदाज असतील.
या संदर्भात राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यात अनौपचारिक बैठक झाली. या बैठकीनंतर भारताच्या संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा, राहुल द्रविड आणि अजित आगरकर यांच्यात काही नावांवर एकमत झाले नाही.
आयसीसीने संघ जाहीर करण्यासाठी १ मेपर्यंतची मुदत दिली होती. त्यामुळे शनिवारी मुंबईविरुद्धच्या दिल्लीच्या सामन्यादरम्यान कर्णधार रोहित शर्माशी संवाद साधण्यासाठी आगरकर थेट दिल्लीला रवाना झाले.
यामध्ये रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव हे ४ फलंदाज, तर हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शिवम दुबे हे ४ अष्टपैलू खेळाडू असतील. ऋषभ पंत, संजू सॅमसन हे दोन विकेटकीपर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल हे फिरकीपटू तर वेगवान गोलंदाजांमध्ये अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. सिराज या तीघांचाच समावेश आहे.
असा असेल संघ
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.