IPL 2024 चे वेळापत्रक समोर आलं, या तारखेला होणार पहिला सामना, शेवटचा सामना केव्हा ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IPL 2024 Timetable : इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएल हे भारतातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट टूर्नामेंट आहे. बीसीसीआयच्या माध्यमातून आयोजित होणारी ही ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट लीग भारतासहित विदेशातही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे.

देशातील लाखो क्रिकेट प्रेमी सध्या आयपीएलच्या पुढील हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएलचा सतरावा हंगाम केव्हा सुरू होणारा हाच प्रश्न क्रिकेटप्रेमींच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. दरम्यान याच संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे.

खरे तर दरवर्षी होणाऱ्या या टूर्नामेंटला क्रिकेटच्या चाहत्यांची विशेष पसंती मिळत असते. यामुळे जानेवारी-फेब्रुवारी महिना संपला की आयपीएल केव्हा सुरू होणार हाच प्रश्न विचारला जातो. अशातच मीडिया रिपोर्ट्समधून पुढील हंगामाबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आयपीएल 2024 यंदा मार्च महिन्यात सुरु होणार आहे. आयपीएल 2024 ची पहिली मॅच 22 मार्च 2024 ला राहणार असा दावा देखील मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. एवढेच नाही तर आयपीएलचा शेवटचा सामना 26 मे 2024 ला खेळवला जाईल असा देखील दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.

तथापि बीसीसीआयच्या माध्यमातून याबाबत कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अजून आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. पण मीडिया रिपोर्ट मध्ये यावर्षी 22 मार्चला आयपीएल सुरू होईल आणि 26 मे ला शेवटची मॅच होईल असा दावा केला जात आहे.

दुसरीकडे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पाहता यंदाची आयपीएल ही भारताबाहेर होणार अशा चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत. यामुळे खरंच आयपीएल यंदा भारताबाहेर राहणार का ? हे पाहण्यासारखे राहणार आहे.

मात्र, काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये आयपीएल भारताबाहेर होणार नसून यावर्षी सुद्धा आयपीएल आपल्या देशातच खेळवले जाईल असे बोलले जात आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नसून लवकरच सरकार सोबत चर्चा करून याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल असे सांगितले आहे.