Mitchell Starc : 19 डिसेंबर 2023 रोजी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने इतिहास रचला होता. हा डावखुरा वेगवान गोलंदाज इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १६ वर्षांच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाइट रायडर्सने त्याला २४.७५ कोटी रुपयांची बोली लावून करारबद्ध केले. त्यावेळी टीमच्या आनंदाला सीमा नव्हती. पण आता अशी एक बातमी समोर आली आहे, ज्यामुळे सर्वांचे मन दुखी होऊ शकते.
खरं तर सध्या IPL 2024 मध्ये मिचेल स्टार्कच्या समावेशावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नुकतेच ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या 3 सामन्यांच्या T20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. या संघात मिचेल स्टार्कचे नाव नव्हते.
क्रिकबझकडून मिळालेल्या माहितीनुसार, या वेगवान गोलंदाजाला दुखापतीमुळे या मालिकेत स्थान मिळालेले नाही. आता ही दुखापत कितपत गंभीर आहे हे सध्या तरी स्पष्ट झालेले नाही. जर ही दुखापत आयपीएल 2024 पर्यंत वाढली तर केकेआर अडचणीत येऊ शकते.
मिचेल स्टार्क आणि दुखापतीचे नाते खूप जुने आहे. त्याच्या कारकिर्दीत त्याने दुखापतीमुळे बरेच चढ-उतार पाहिले आहेत. सर्वप्रथम त्याला 2013 मध्ये स्ट्रेस फ्रॅक्चर झाले ज्यामुळे त्याला बाहेर जावे लागले. 4 महिने खेळल्यानंतर, पुन्हा डाव्या पायाच्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला आयपीएल 2015 मधून बाहेर पडावे लागले. जुलैमध्ये पुनरागमन केल्यानंतर मिचेल स्टार्क नोव्हेंबरमध्ये पुन्हा शस्त्रक्रियेमुळे 6 महिने क्रिकेटपासून दूर होता. अलीकडेच, २०२३ च्या विश्वचषकापूर्वीही ३३ वर्षीय गोलंदाज दुखापतीच्या समस्येला तोंड देत होता.
आता प्रश्न असा पडतो की जर मिचेल स्टार्क आयपीएल 2024 चा हंगाम सुरू होण्याआधीच बाहेर पडला तर फ्रँचायझीला त्याला 24.75 कोटी रुपये द्यावे लागतील की नाही? तर आयपीएलच्या नियमांनुसार, जर एखादा खेळाडू हंगाम सुरू होण्यापूर्वी दुखापतीमुळे बाहेर असतो, तेव्हा फ्रँचायझी त्याला कोणतेही पैसे देण्यास बांधील नाही.
त्याच वेळी, जर खेळाडूला हंगामात कोणतीही समस्या आली, तर फ्रँचायझी पगाराव्यतिरिक्त उपचाराचा संपूर्ण खर्च उचलते. आता मिशेल स्टार्क वेळेत तंदुरुस्त होण्यास सक्षम आहे की नाही हे पाहणे मनोरंजक असेल कारण 22 मार्चपासून आयपीएल 2024 ची सुरुवात जवळपास निश्चित आहे.