सर्व भारतीयांचं लक्ष कालपासून पॅरिस ऑलिम्पिककडे लागले होते. याचे कारण म्हणजे भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट. परंतु आता करोडो भारतीयांची निराशा करणारी बातमी आली आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमधील अंतिम सामन्यातून विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आले आहे. जसा बातमीचा धक्का बसला तसेच धक्कादायक कारण तिला अपात्र ठरवण्याबाबत आहे. तिचे वजन ५० किलोपेक्षा थोडे जास्त असल्याने पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडावे लागले आहे.
५० ते १०० ग्राम वजन जास्त भरल्याने हे सगळे घडले असल्याचे वृत्त समजले आहे. ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती विनेश फोगट.
५० किलो वजनी गटात क्युबाच्या युसनेलिस गुझमन लोपेझचा ५-० असा पराभव करून सुवर्णपदक जिंकण्याच्या दिशेने पाऊल टाकले होते. पण अंतिम सामन्याच्या आधी, विनेश फोगटचे वजन निर्धारित मानकांपेक्षा 50 ग्रॅम ते 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आल्याने ती अपात्र झाली
आणि सर्वच भारतीयांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले. विनेश फोगट प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करू शकत होती पण स्वतःकडे झालेले दुर्लक्ष तिला अपात्र करून गेले.
तिने व प्रशिक्षकाने तिच्या आहाराची किंवा इतर काही गोष्टींची काळजी घेतली असती तर कदाचित भारताने एक वेगळाच इतिहास रचला असता. वजन 50 ते 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आल्यानंतर ही कारवाई झाली.
इतिहास घडला असता…
विनेश फोगटने सुवर्णपदक जिंकले असते तर भारतासाठी हा मोठा रेकॉर्ड झाला असता. याचे कारण असे की, विनेश फोगट ही ऑलिम्पिकमधील अंतिम फेरी गाठणारी पहिलीच भारतीय महिला कुस्तीपटू होती.
कुस्तीमध्ये देशाला पहिले सुवर्णपदक जिंकून देण्याची संधी विनेशकडे आली होती. पण तिच्यासह भारताची अपेक्षा फोल ठरली.