Cricket World Cup : क्रिकेट विश्वचक ची रणधुमाळी जोरात सुरू आहे. या काळात मोबाइलवर मॅच पाहणाऱ्यांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. डिस्ने हॉट स्टार वर्ल्ड कपचे थेट प्रक्षेपण प्रेक्षकांसाठी विनामूल्य दाखवत असले तरी
यात काही लोकांना खूप पैसे कमावण्यात यश आले असून त्यातून त्यांना भरपूर उत्पन्न मिळत आहे. होय, आम्ही बोलत आहोत रिलायन्स जिओचे मालक मुकेश अंबानी आणि भारती एअरटेलचे प्रमुख सुनील भारती मित्तल यांच्याबद्दल.
* ६ टक्के वाढ अपेक्षित
मीडिया रिपोर्ट्सनुसार, वर्ल्ड कपदरम्यान अनलिमिटेड डेटासाठी रिचार्ज करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेल या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या आहेत. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार,
रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल डिसेंबर तिमाहीत मोबाइल डेटा वापरात सुमारे 6 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. वाढत्या डेटा वापरामुळे हे वाढत आहे.
* साडेतीन कोटी प्रेक्षकांनी हा सामना लाइव पाहिला
व्होडाफोन-आयडियाचा डेटा वापर ३ ते ४ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. मोबाइल डेटाच्या वापराचा थेट परिणाम कंपन्यांच्या नफ्यावर होणार आहे. डिस्ने हॉट स्टारवर दाखवल्या जाणाऱ्या फ्री मॅचमुळे लोक अधिकाधिक अनलिमिटेड डेटा पॅक रिचार्ज करत आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना १४ ऑक्टोबर रोजी साडेतीन कोटी प्रेक्षकांनी लाइव पाहिला होता. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे.
विश्वचषकचा अंतिम सामना १९ नोव्हेंबरला होणार आहे. यात टेलिकॉम कंपन्यांना अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे. लोक सतत अनलिमिटेड डेटा पॅकवर लक्ष केंद्रित करत असतात. चालू डिसेंबर तिमाहीत टेलिकॉम कंपन्यांच्या निव्वळ नफ्यात ५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
मात्र, याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. जिओच्या डेटा वापरकर्त्यांमध्ये ८ टक्के आणि एअरटेलच्या डेटा वापरकर्त्यांमध्ये ४.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.