ODI World Cup 2023 : 10 संघ आणि 34 सामने.. सुरु झाली विश्वचषक शर्यत; ‘या’ ठिकाणी पाहता येणार सामने

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ODI World Cup 2023 : क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आतुरतेने वाट पाहत असणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. या विश्वचषकात 10 संघ आमनेसामने भिडणार आहेत. याबाबतचे एक वेळापत्रक जाहीर झाले आहे.

तसेच यासाठी आतापर्यंत भारतासह, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे थेट पात्र ठरले असून झिम्बाब्वे या ठिकाणी ही स्पर्धा खेळवली जात आहे.

पात्र संघ

सध्या एकदिवसीय विश्वचषक पात्रता फेरीत 10 संघ सहभागी झाले आहेत. यात झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज, आयर्लंड, स्कॉटलंड, नेदरलँड, श्रीलंका तसेच ओमान, नेपाळ, अमेरिका आणि यूएई संघांचा समावेश असेल. यादरम्यान एकूण 34 सामने खेळवले जाणार असून या 10 संघांमधून 2023 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी 9व्या आणि 10व्या स्थानासाठी दोन संघ निवडण्यात येतील. तसेच विश्वचषक 2023 साठी भारत, इंग्लंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान तसेच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका हे 8 संघ थेट पात्र ठरले आहेत.

असे आहेत संघ

अ गट: झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज, नेदरलँड्स, नेपाळ आणि अमेरिका
ब गट: श्रीलंका, आयर्लंड, स्कॉटलंड, ओमान आणि संयुक्त अरब अमिराती

पात्रता

1. सर्वात अगोदर दोन्ही गटांचे संघ त्यांच्या गटातील संघांकडून प्रत्येकी एक सामना खेळणार आहेत.
2. 27 जूनपर्यंत ग्रुप स्टेजमध्ये 20 सामने पार पडतील.
3. या दोन्ही गटातील टॉप 3 संघ सुपर 6 साठी पात्र ठरणार आहेत.
4. सुपर 6 सामने 29 जूनपासून सुरू होणार असून यानंतर दोन संघ अंतिम फेरीत प्रवेश करतील.
5. तसेच अंतिम फेरीत पोहोचणारे दोन्ही संघ विश्वचषकासाठी पात्र असणार आहेत.

या ठिकाणी पहा सामने

आता तुम्हाला भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर ICC विश्वचषक पात्रता 2023 पाहता येतील. तसेच हा सामना तुमच्या फोनवर डिस्ने प्लस हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीम केला जाईल. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 12.30 वाजता सुरू होणार आहेत.

वेळापत्रक

18 जून
झिम्बाब्वे विरुद्ध नेपाळ
वेस्ट इंडिज वि यूएसए
जून १९
श्रीलंका विरुद्ध संयुक्त अरब अमिराती
आयर्लंड विरुद्ध ओमान
20 जून
झिम्बाब्वे विरुद्ध नेदरलँड
नेपाळ वि यूएसए
21 जून
ओमान विरुद्ध संयुक्त अरब अमिराती
आयर्लंड वि स्कॉटलंड
22 जून
वेस्ट इंडिज विरुद्ध नेपाळ
नेदरलँड वि यूएसए
23 जून
स्कॉटलंड विरुद्ध संयुक्त अरब अमिराती
श्रीलंका वि ओमान
24 जून
नेदरलँड विरुद्ध नेपाळ
झिम्बाब्वे विरुद्ध वेस्ट इंडिज
25 जून
स्कॉटलंड विरुद्ध ओमान
श्रीलंका वि आयर्लंड
26 जून
वेस्ट इंडिज विरुद्ध नेदरलँड
झिम्बाब्वे वि यूएसए
27 जून
आयर्लंड विरुद्ध संयुक्त अरब अमिराती
श्रीलंका वि स्कॉटलंड
२९ जून
सुपर 6: A2 वि B2, क्वीन्स स्पोर्ट्स क्लब
३० जून
सुपर 6: A3 वि B1, क्वीन्स स्पोर्ट्स क्लब
प्लेऑफ: A5 वि B4, ताकाशिंगा क्रिकेट क्लब
१ जुलै
सुपर 6: A1 वि B3, हरारे स्पोर्ट्स क्लब
2 जुलै
सुपर 6: A2 वि B1, क्वीन्स स्पोर्ट्स क्लब
प्लेऑफ: A4 वि B5, ताकाशिंगा क्रिकेट क्लब
3 जुलै
सुपर 6: A3 वि B2, हरारे स्पोर्ट्स क्लब
4 जुलै
सुपर 6: A2 वि B3, क्वीन्स स्पोर्ट्स क्लब
प्लेऑफ: 7 वी विरुद्ध 8 वी ताकाशिंगा क्रिकेट क्लब
5 जुलै
सुपर सिक्स: A1 विरुद्ध B2, हरारे स्पोर्ट्स क्लब
6 जुलै
सुपर सिक्स: A3 वि B3, क्वीन्स स्पोर्ट्स क्लब
प्लेऑफ: 9 वी विरुद्ध 10 वी ताकाशिंगा क्रिकेट क्लब
जुलै 07
सुपर सिक्स: A1 विरुद्ध B1, हरारे स्पोर्ट्स क्लब
जुलै 09
अंतिम, हरारे स्पोर्ट्स क्लब