Rishabh pant : लवकरच होऊ शकतो रिषभचा कमबॅक, खेळणार ‘या’ टीम विरुद्ध, वाचा सविस्तर..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rishabh Pant : सध्या आईसीसी वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने उत्तम कामगिरी केली असून, सर्व सामने जिंकत पॉईंट टेबलवरती आपला पहिला क्रमांक टिकवून ठेवला आहे. दरम्यान, दुसरीकडे भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचीही चर्चा सुरू झाली आहे. यामुळे सध्या एका खेळाडूला घेऊन जोरदार चर्चा होत आहे. ती म्हणजे भारतीय संघातील तुफानी खेळाडू ऋषभ पंत.

दरम्यान, ऋषभ पंत दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये नव्याने कमबॅक करू शकतो. अशी सर्वत्र चर्चा सुरु आहे. यामुळे जर रिषभ पंत खरंच पुनरागमन करणार असेल तर क्रिकेटच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी असेल.

दरम्यान, रिषभ पंतचा काही दिवसांपूर्वी मोठा अपघातझाल्या असल्यामुळे, गेले अनेक महिने रिषभ पंत मैदानाच्या बाहेर आहे. दरम्यान, ऋषभ पंत आता बऱ्यापैकी सावरला असून त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दररोज तो हातात बॅट घेऊन सराव करताना दिसतो. आता त्यांच्या तब्येतीत बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. यामुळे तो लवकरच कमबॅक करेल अशी सर्वाना आशा आहे.

दरम्यान, ऋषभ पंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुनरागमन करू शकतो, अशी चर्चा सुरु असून, ही भारतीय संघासाठी चांगली बातमी ठरेल, असे मानले जात आहे. दरम्यान, याबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती ही पंत किंवा बीसीसीआयकडून दिली गेली नाहीये. परंतु मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे. पंत हा एक उत्तम विकेटकीपर असून, त्याची मैदानावर कामगिरी ही नेहमी उत्तम असते.

दरम्यान, सध्या भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड कपमध्ये धुमाकूळ घालत असून, आतापर्यंतचे सर्व सामने भारताने जिंकले आहेत. दरम्यान, भारत 8 विजयानंतर 16 गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर आयसीसी विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलेल्या दक्षिण आफ्रिका संघ दुसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान, सर्व खेळाडूंचा परफॉर्मन्स उत्तम असल्यामुळे सध्या ते फॉर्ममध्ये आहेत.