क्रीडा

सचिन तेंडुलकरचा मुलगा IPL न खेळताच झाला स्पर्धेतून आऊट

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :-  आयपीएलच्या १४ व्या पर्वात मुंबई इंडियन्सनं सचिन तेंडुलकर यांचे चिरंजीव अर्जुन तेंडुलकरला आपल्या संघात दाखल करून घेतले.

पण, पदार्पणाची संधी न देताच मुंबई इंडियन्सनं अर्जुनच्या जागी दिल्लीचा गोलंदाज सिमरजीत सिंग याला करारबद्ध केले आहे. मुंबई इंडियन्सनं स्वतः हे अपडेट्स दिले आहेत.

आयपीएल 2021 खेळण्यासाठी युएईला गेलेल्या अर्जुन तेंडुलकरला बुधवारी दुखापत झाली आहे, ज्यामुळे तो संपूर्ण मोसम बाहेर झाला आहे. अर्जुन तेंडुलकरच्याऐवजी सिमरजीत सिंग याची उरलेल्या सामन्यांसाठी टीममध्ये निवड केल्याचं मुंबई इंडियन्सनेसांगितलं आहे.

डावखुरा फास्ट बॉलर अर्जुन तेंडुलकरला मुंबईने या वर्षाच्या सुरुवातीला लिलावात विकत घेतलं होतं. अर्जुन तेंडुलकरसाठी मुंबई इंडियन्सने लिलावात 20 लाख रुपये खर्च केले होते. अर्जुन तेंडुलकरच्या जागी टीममध्ये आलेल्या सिमरजीत सिंग याने नियमानुसार असलेला क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्याची माहिती मुंबई इंडियन्सने दिली आहे.

मुंबई इंडियन्सनं मंगळवारी पंजाब किंग्सला पराभूत करून प्ले ऑफचे आव्हान कायम राखले. त्य़ांनी १० गुणांसह सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यात उर्वरित चार सामन्यांत विजय मिळवून ऐटीत प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचा त्यांचा मानस आहे.

अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नसता प्रयोग करण्याचं धाडस नक्की करणार नाही. त्यामुळे अर्जुनला या पर्वात तरी पदार्पणाची संधी मिळणे अवघड होतेच. त्यात बुधवारी अर्जुन तेंडुलकर जखमी असल्याचे वृत्त समोर आले आणि मुंबई इंडियन्सनं त्याला बदली खेळाडू म्हणून दिल्लीचा गोलंदाज सिमरजीत सिंगची निवड केली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office