रविवारी वर्ल्डकपची फायनल ! कधी सुरु होणार? पीच कसे आहे? पाऊस राहणार का? टीम कोणती असणार? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर

Ahmednagarlive24 office
Published:
World Cup Final

World Cup Final : वर्ल्ड कप 2023 चा फिव्हर आता हॅन्गओहर झाला आहे. अवघ्या दोन दिवसावर फायनल मॅच येऊन ठेपलीये. रविवारी ऑस्ट्रेलिया व भारत असा हा सामना रंगणार आहे. करोडो लोक या सामन्याचा आनंद घेतील. हे सामने पाह्यला जाणाऱ्यांसाठी रेल्वेने देखील खास सोय केली आहे.

यावरूनच वर्ल्डकपच्या क्रेझ लक्षात येईल. तब्बल 20 वर्षानंतर ऑस्ट्रेलिया व भारत असा सामना रंगणार आहे. याआधी 2003 ला ऑस्ट्रेलिया व भारत असा सामना रंगला होता. यात भारत हरला होता. परंतु यावेळी भारत फॉर्म मध्ये आहे.

आजपर्यंत या वर्ल्डकपमधील एकही मॅच भारताने हरली नाही. त्यामुळे आता इतिहासाची पुनरावृत्ती होणार की भारत विश्वविजेता होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यामुळे आता आपण येथे मॅच संदर्भात सर्व माहिती जाणून घेऊयात.

* फायनल मॅच कधी? कोठे व किती वाजता?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 नोव्हेंबर 2023 (रविवार) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होईल. दुपारी दीड वाजता टॉस होईल. त्यामुळे दोन वाजताच या सामन्याचा थरार सुरु होईल हे निश्चित. विशेष म्हणजे येथील वातावरण एकदम स्वच्छ असेल. पावसाची कोणतीही छाया सामन्यावर नसेल असा अंदाज आहे.

* कोठे पाहता येतील हे सामने

हे सामने तुम्ही स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर विविध भाषेतील चॅनलवर पाहू शकता. तसेच हे सामने ऑनलाईन स्ट्रीमिंगद्वारेही पाहू शकता.

* अशी असणार भारताची टीम

रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव

* अशी असणार ऑस्ट्रेलियाची टीम

पैट कमिंस (कॅप्टन), स्टीव स्मिथ, एलेक्स कैरी, जोश इंग्लिस, सीन एबॉट, कैमरन ग्रीन, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मैक्सवेल, मार्कस स्टोइनिस, डेविड वॉर्नर, एडम जम्पा, मिशेल स्टार्क

* बॉलरसाठी आहे खास पीच, बॅट्समनला जाईल त्रासदायक

नरेंद्र मोदी स्टेडियम जे आहे त्या ग्राऊंडवरील पीच हे बॉलरसाठी खास आहे. येथे बॅट्समन जास्त टिकाव धरू शकत नाहीत. त्यामुळे येथे गोलंदाजांची कमाल दिसून येईल. या आधी येथे जे सामने झाले त्यात गोलंदाजच भारी ठरले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe