World Cup : क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना भरपूर पैसे मिळतात हे सर्वश्रुत आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी असो की मग आताची वर्ल्डकप असो. करोडो रुपये हे प्लेअर कमावत असतात. या खेळाडूंच्या कमाईबाबत नेहमीच उत्सुकता लागलेली पाहायला मिळते.
आता एक खास चर्चा सुरु आहे ती म्हणजे रविवारी होणाऱ्या वर्ल्डकपमधील फायनलच्या सामन्यातील विजेत्यांना किती पैसे मिळणार? तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल विजेत्या संघाला करोडो रुपये तर मिळणार आहेतच परंतु ठरणाऱ्या संघाला देखील करोडो रुपये मिळणार आहेत. चला जाणून घेऊयात याबद्दल –
* करोडोंचे बक्षीस
रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियम वर भारत व ऑस्ट्रेलिया यांमध्ये सामना रंगेल. यामध्ये दोन्ही संघाला देखील बक्षीस मिळणार आहे. जो संघ जिंकेल त्यालाही बक्षीस व जो हरेल त्यालाही बक्षीस मिळेल. यात जो संघ हरेल अर्थात उपविजेता होईल त्या संघाला 20 लाख डॉलर्स (सुमारे 16.58 कोटी रुपये) बक्षीस दिले जाणार आहे. ही जेतेपदाची लढाई जिंकणाऱ्या संघाला 40 लाख डॉलर (सुमारे 33.17 कोटी रुपये) बक्षीस दिले जाईल.
* इतर संघांनाही बक्षिसे जेते उपविजेते संघाची बक्षिसे
तर आपण पहिली. परंतु इतर संघानेही बक्षिसे पटकावली आहेत. ते आपण पाहुयात. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना आठ लाख डॉलर्स (सुमारे 6.63 कोटी रुपये) मिळतील. या व्यतिरिक्त, ग्रुप स्टेजमधून बाहेर पडलेल्या 6 संघांना प्रत्येकी $ 1 लाख म्हणजे अंदाजे 82 लाख रुपये मिळतील.
याशिवाय ग्रुप स्टेजमधील प्रत्येक सामना जिंकणाऱ्या प्रत्येक संघासाठी आयसीसीने स्वतंत्र बक्षीस रक्कम ठेवले होते.यात ग्रुप स्टेजमधील प्रत्येक सामना जिंकल्याबद्दल घांना $ 40,000 म्हणजेच अंदाजे 33.17 लाख रुपयांचे बक्षीस मिळालेले आहे.
* रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर थरार
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 नोव्हेंबर 2023 (रविवार) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. हे सामने दुपारी 2 वाजता सुरू होतील. करोडो क्रिकेटप्रेमी याचा आनंद घेतील.