भारतीय क्रिकेटमधील वादग्रस्त आणि तितकेच चर्चित नाव म्हणजेच विनोद कांबळी त्यांच्या पहिली पत्नी कोण, त्या आता काय करतात, याबद्दल अनेकांना कुतूहल आहे. काही दिवसांपासून विनोद कांबळीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा रंगल्या आहेत. विनोदचे नाते दुसऱ्या पत्नीशी असल्याने पहिली पत्नी वेगळी राहते. पण पहिली पत्नी तरी सध्या काय करते, याबद्दलची माहिती आता समोर आली आहे.
विनोदने धर्मपरिवर्तन देखील केले…
विनोद कांबळीची पहिली पत्नी नोएला लुईस (Noella Lewis) ही ख्रिस्ती परिवारातील होती. तिच्यासोबत लग्न करताना विनोदने धर्मपरिवर्तन देखील केले होते, असे म्हटले जाते. क्रिकेटक्षेत्रात नाव कमवलेला विनोद आपल्या वैयक्तिक आयुष्यातही अशा मोठ्या निर्णयांसाठी ओळखला जातो.
लग्नापूर्वीची नोएला
नोएला लुईस लग्नापूर्वी पुण्यात एका हॉटेलच्या रिसेप्शन विभागात काम करत होती. तिथेच विनोद आणि नोएला यांची ओळख झाली. दोघांनीही एकमेकांना जवळून ओळखल्यानंतर त्यांनी १९९८ साली पुण्यात विवाह केला. लग्नानंतर नोएला क्रिकेटपटू विनोद कांबळीची पत्नी म्हणूनही अल्प काळात चर्चेत आली होती.
लग्न का तुटले ?
विनोद आणि नोएला यांचे नाते काही काळ चांगले चालले. मात्र, पुढे विनोदचा मद्यपानाकडे कल, यामुळे कुटुंबीय आणि करिअर दोन्हींकडे त्याचा नकारात्मक परिणाम होऊ लागला. त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण झाला. अखेर नोएलाने काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघेही विभक्त राहू लागले.
नोएला काय करते ?
नोएला लुईस पुण्यातच राहते. ती केंद्र सरकारच्या जेल मंत्रालयाशी निगडित काम करते. तसेच, इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रातही ती कार्यरत असल्याचे सांगितले जाते. विनोदपासून विभक्त झाल्यानंतर तिने अनेक सामाजिक आणि सार्वजनिक उपक्रमात सहभाग घेऊन स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र
विनोद कांबळीची पहिली पत्नी नोएला लुईस विभक्त झाल्यानंतरही आपले आयुष्य नेटाने जगताना दिसते. सरकारी प्रकल्पांतर्गत काम करून आणि इव्हेंट मॅनेजमेंटमधील सहभागातून ती आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाली आहे. सेलिब्रेटीशी जोडले गेलेले नाव असूनही तिने आपली वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे.