Women’s Asia Cup : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून अर्थातच बीसीसीआयकडून इमर्जिंग महिला आशिया चषक स्पर्धेसाठी भारत अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 13 जूनपासून ही स्पर्धा पार पडणार आहे. श्वेता सेहरावतकडे संघाचे नेतृत्व सोपवले आहे.
श्वेता ही मागील वर्षी अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाची उपकर्णधार होती. तर सौम्या तिवारीला उपकर्णधारपद सोपवले होते. हा सामना हाँगकाँगमध्ये पार पडणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यावर्षी प्रथमच इमर्जिंग T20 आशिया कपची सुरुवात होत आहे.
“अखिल भारतीय महिला निवड समितीने नुकतेच आगामी एसीसी इमर्जिंग महिला आशिया चषक स्पर्धेसाठी भारत अ संघाची निवड केली असल्याचे बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
या स्पर्धेत आठ संघ सहभागी होत आहेत. त्यांची दोन गटात विभागणी केली आहे. भारताचा गट-अ मध्ये हाँगकाँग, पाकिस्तान-अ, थायलंड-अ तर बांगलादेश-अ, श्रीलंका-अ, मलेशिया आणि संयुक्त अरब अमिराती गट-ब मध्ये आहेत. दरम्यान या स्पर्धेचा अंतिम सामना 21 जून रोजी पार पडणार आहे.
भारत-अ संघात अशा खेळाडूंचा समावेश केला आहे ज्यांनी या वर्षी जानेवारीमध्ये आयसीसी अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक जिंकला होता. या स्पर्धेत शेफाली वर्माकडून संघाचे नेतृत्व करण्यात आले होते, तर श्वेताने फलंदाजीने सर्वाधिक धावा करण्यात आल्या होत्या. श्वेता सेहरावतने सात सामन्यांमध्ये 99 च्या अप्रतिम सरासरीने आणि तीन अर्धशतकांच्या मदतीने 297 धावा केल्या होत्या.
भारत-अ (उभरती संघ): श्वेता सेहरावत (कर्णधार), सौम्या तिवारी, त्रिशा गोंगडी, मुस्कान मलिक, श्रेयंका पाटील, कनिका आहुजा, उमा छेत्री, ममता माडीवाला, तीतस साधू, यशश्री एस, काश्वी गौतम, पार्श्वी चोप्रा, मन्नत कश्यप, बी अनुषा.
मुख्य प्रशिक्षक: नुशीन अल खादीर
भारत-अ चे वेळापत्रक:
12 जून विरुद्ध हाँगकाँग
15 जून विरुद्ध थायलंड-ए
17 जून विरुद्ध पाकिस्तान ए
फक्त एकदाच मिळवता आले विजेतेपद
उदयोन्मुख महिला आशिया चषक स्पर्धेची ही पाचवी आवृत्ती असून 2013 मध्ये सिंगापूरमध्ये पहिल्यांदाच याचे आयोजन केले होते, ज्यात भारतीय संघाने पाकिस्तानला हरवून विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर 2017 आणि 2018 च्या स्पर्धा श्रीलंकेने जिंकल्या होत्या. 2019 साली बांगलादेशमध्ये शेवटच्या वेळी ही स्पर्धा पार पडली होती, जी पाकिस्तानच्या नावावर होती.