WTC Final 2023: IPL 2023 नंतर आता भारतीय संघ World Test Championship साठी सज्ज झाली आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या भारतीय संघ ७ जूनपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध WTC 2023 फायनल खेळणार आहे.
हा सामना लंडनमधील ओव्हल येथे होणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा WTC च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे, तर कांगारूंनी प्रथमच हे स्थान गाठले आहे. गेल्या वेळी भारतीय संघाला अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी भारतीय संघाला मागील निराशेवर मात करून जेतेपदासह देशात परतायचे आहे. हा रोमांचक सामना तुम्ही भारतात कधी, कुठे आणि कसा थेट पाहू शकता, त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणार्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान होणार आहे. हा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होईल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणार्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये होणार आहे. यासाठी लंडनच्या ओव्हल क्रिकेट ग्राउंडला यजमानपद देण्यात आले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केले जाईल. ऑनलाइन स्ट्रीमिंगसाठी तुम्ही Disney+ Hotstar अॅपमध्ये लॉग इन करू शकता.
पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि डेव्हिड वॉर्नर.
रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट आणि इशान किशन ( यष्टिरक्षक).
हे पण वाचा :- Maharashtra Monsoon Update: अरे वाह! ‘या’ दिवशी राज्यात दाखल होणार मान्सून, जाणून घ्या IMD अलर्ट