WTC Final : IPL 2023 नंतर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाला विरूद्ध खेळणार आहे.
मात्र या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार खेळाडू आणि सलामीवीर केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. यामुळे आता BCCI ने एक मोठी घोषणा करत राहुलच्या जागी ईशान किशनचा संघात समावेश केला आहे. याच बरोबर तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या BCCI ने रुतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आणि मुकेश कुमार यांना स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड केली आहे.
IPL 2023 मध्ये क्षेत्ररक्षण करताना KL राहुलला त्याच्या उजव्या मांडीला दुखापत झाली, ज्यामुळे त्याला WTC फायनलमधून बाहेर पडावे लागले. राहुलवर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. राहुलच्या जागी ईशान किशनचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेसाठी इशानचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता, मात्र त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकली नाही.
ईशान किशनशिवाय सूर्यकुमार यादव, मुकेश कुमार आणि रुतुराज गायकवाड यांनाही स्टँडबाय खेळाडू म्हणून संघात ठेवण्यात आले आहे. सूर्यकुमारने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये पदार्पण केले होते, परंतु तो केवळ 8 धावा करू शकला.
IPL 2023 मधील उत्कृष्ट फॉर्मसाठी रुतुराज गायकवाडला बक्षीस मिळाले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जूनपासून ओव्हलवर खेळवला जाणार आहे.
IPL 2023 मध्ये इशान किशनची कामगिरी काही खास नाही. इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामात खेळल्या गेलेल्या 10 सामन्यांमध्ये इशानच्या बॅटने 136 च्या स्ट्राइक रेटने 293 धावा केल्या आहेत.
मुंबई इंडियन्सकडून खेळताना इशानने या मोसमात केवळ दोन अर्धशतके झळकावली असून तो धावांसाठी संघर्ष करताना दिसत आहे.
हे पण वाचा :- IMD Alert Today : सावधान .. पुन्हा एकदा 15 राज्यांमध्ये पाऊस-मेघगर्जनेचा इशारा ; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स