अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-   किरकोळ कारणातून दोघांनी तरूणाला दगडाने मारहाण केली. या मारहाणीत योगेश पुंडलीक जावळे (वय 28 रा. मळ्याचीवाडी, तारकपूर) हा तरूण जखमी झाला आहे.

याप्रकरणी त्याने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तारकपूर बस स्थानकच्या मागे मळ्याचीवाडी येथे शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.

भारत माणिक पंडित (रा. मळ्याचीवाडी, तारकपूर) व वर्षा महागडे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. भारत पंडित हे फिर्यादी यांचे काका आहेत.

त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ केले होते. याविषयी शुक्रवारी सकाळी फिर्यादी त्यांची मावशी विद्या भारत पंडित यांना सांगत असताना ते भारत पंडित याने ऐकले.

तेव्हा भारत याने पुन्हा फिर्यादीला शिवीगाळ केले. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या फिर्यादीला भारत व वर्षा यांनी खाली पाडून दगडाने मारहाण करत जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार एस. शिरसाठ करीत आहे.