अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Successful Women Farmer :- असं म्हणतात की, माणसाने एखादी गोष्ट मिळवायची असं ठरवल तर त्याला ती गोष्ट नक्कीच मिळते मात्र यासाठी त्याला कष्टाची सांगड घालावी लागते आणि मग निश्चितच असा व्यक्ती यशस्वी होतो.

झारखंडच्या (Jharkhand) हजारीबाग जिल्ह्यापासून 15 किमी अंतरावर असलेल्या चर्ही येथे राहणाऱ्या महिला शेतकऱ्यांनी (Women Farmer) देखील आपल्या इच्छेला अपार कष्टाची सांगड घालत चांगले मोठे यश संपादन केले आहे.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, येथे राहणाऱ्या महिलांनी काळाच्या ओघात बदल करत गट शेतीचे (Farming) महत्व अधोरेखित केले आहे.

सामुदायिक शेतीकडे (Group Farming) एक पाऊल टाकत येथील सुमारे 700 महिला शेतकऱ्यांनी 200 एकर जमिनीवर टरबूजाची लागवड (Watermelon Farming) करून लाखोंचा नफा कमवला आहे.

या सर्व महिला शेतकर्‍यांच्या जमिनी अगदी छोट्या तुकड्यांमध्ये होत्या अर्थातच सर्व महिला शेतकरी अल्पभूधारक होत्या. असे असले तरी येथील शेतकरी संपूर्ण जमीन कसत नव्हते.

संपूर्ण शेती पावसावर अवलंबून होती. अशा परिस्थितीत या महिलांनी एक गट तयार केला आणि नंतर स्वतःच्या जमिनी एकत्र करून, शेतीसाठी मोठी जमीन तयार केली आणि गट शेती सुरू केली.

त्यामुळे या महिलांना चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. या महिलांनी पुन्हा एकदा सामूहिक शेतीचे महत्त्व जगासमोर मांडले आहे. हजारीबागच्या आजूबाजूचे वातावरण आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांतील टरबूजाची मागणी पाहता महिलांनी टरबूजाची लागवड करण्याचा निर्णय घेतला.

सर्वप्रथम त्यांनी शेती करण्याचा संकल्प केला. कोरोनामुळे लॉकडाऊन असूनही त्यांना चांगला नफा मिळाला. त्यानंतर या महिलांनी मोठ्या प्रमाणावर टरबूजाची लागवड सुरू केली.

आता हे टरबूज हजारीबाग तसेच आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आणि शेजारच्या राज्यांमध्ये पाठवले जात आहेत. जिथे या महिला शेतकर्‍यांना शेतीतून वर्षभरात 20 ते 30 हजार मिळायचे, आज त्यांचे उत्पन्न 4 ते 5 पटीने वाढले आहे,

शेतकऱ्यांनी किती जमीन पिकवली आहे, त्यानुसार त्याचा नफा ठरवला जातो. या शेतकरी महिला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे मोठ्या प्रसन्न आहेत आणि आता बारामती शेती करण्याचे उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवत आहेत.