file photo

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :-  शहरातील कालेमळा येथील गोरक्षनाथ वसाहतीत एका वृद्धाने राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून जीवनयात्रा संपविल्याची घटना मंगळवारी (ता.12) सकाळी उघडकीस आली आहे.

लक्ष्मण काशिनाथ नेवगे (वय 76) असे मयत वृद्धाचे नाव आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,

शहरातील कालेमळा येथील गोरक्षनाथ वसाहतीत वास्तव्यास असलेले वृद्ध लक्ष्मण नेवगे यांनी गॅलरीमध्ये दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली.

सदर प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी दिलीप लक्ष्मण नेवगे यांनी दिलेल्या खबरीवरुन पोलिसांनी अकस्मात मृत्यू क्रमांक 52/2021 सीआरपीसी 174 प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौजदार एस. सी. पवार हे करत आहे. तत्पूर्वी आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस तपासानंतरच ते स्पष्ट होणार आहे.