Ahmednagar Politics : शिवसेनेच्या संदर्भात केलेले भाष्य हे फक्त पारनेर तालुक्याच्या राजकीय परीस्थीतीच्या पार्श्वभूमीवर होते.परंतू त्याचा राज्याच्या राजकारणाशी संबंध जोडून विपर्यास केला गेला.जिल्ह्यात राजकीय निर्णय घेताना प्रदेश भाजपा पदाधिकाऱ्यांचाच अंतिम आदेश मानला जाईल आशी भूमिका खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केली.

पारनेर यैथे आयोजित कार्यक्रमात बोलताना खा.डॉ सुजय विखे पाटील म्हणाले की नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून मला निवडून आणण्यात पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.

परंतू या तालुक्याच्या बदलत्या राजकीय वातावरणात शिवसैनिकावर होत असलेला अन्याय तसेच राज्यात आघाडी सरकार असतानाही तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा होत नसलेला विचार पाहाता या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहाण्याची किंवा त्यांना बरोबर घेवून जाण्याच्या दृष्टीने आपण भाष्य केले.परंतू माझ्या वक्तव्याचा थेट राज्यातील राजकारणाशी संबंध जोडून विपर्यास केला असल्याचे खा.विखे पाटील म्हणाले.

जिल्ह्यात कोणतीही राजकीय भूमिका किंवा निर्णय करताना अंतिम निर्णय हा प्रदेश आणि जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेवूनच करण्याची भूमिका आपली कायम असून याबाबतचा अंतिम निर्णय सुध्दा त्याचाच असणार आहे. पारनेर तालुक्याच्या राजकीय परिस्थितीची वस्तूस्थिती आपण वरिष्ठांना देवून यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.