अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 Krushi news :- सध्या एप्रिलचा महिना (April Crop) सुरू आहे. हा महिना उन्हाळी पिकाच्या पेरणीसाठी सर्वात योग्य असतो. उन्हाळी हंगामात (Summer Season) शेतकरी बांधव काकडी, कारले, पालक, फ्लॉवर, वांगी, लेडीज फिंगर आणि आर्बी इत्यादी भाजीपाला वर्गीय पिकांची (Vegetable class crops) लागवड करत असतात.

शेतकरी मित्रांनो (Farmers) जसे की आपणास ठाऊकचं आहे रब्बी पिकांची (Rabbi Crop) काढणी (Harvesting) आणि खरिपाच्या पेरणीपूर्वी (Kharif Season) काही काळ शेत रिकामे असते, या काळात ज्या पिकांची लागवड केली जाते त्या पिकांना उन्हाळी पिके (Summer Crop) म्हणून संबोधले जाते.

खरं पाहता उन्हाळी हंगामात शेतकरी बांधवांना इतर पिके घेण्यास पुरेसा वेळ मिळतो. शेतकरी मित्रांनो जर तुम्हीही तुमच्या शेतात उन्हाळी हंगामात उन्हाळी पीके लावले असतील तर त्यातून तुम्हीही जास्त नफा मिळवू शकता, कारण उन्हाळ्यात बाजारात भाजीपाला (Vegetable) आणि फळांना (Fruits) सर्वाधिक मागणी असते.

जर तुम्हाला उन्हाळी पिकातून जास्त उत्पादन घ्यायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या पिकातून अधिक उत्पादन मिळवू शकता आणि चांगला बक्कळ पैसा कमवू शकता.

उन्हाळी पिकातून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी करा हे काम (Do this to get good yield from summer crop) उन्हाळी हंगामात पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी, पहिले तुम्हाला तुमचे वावर काही काळ रिकामे ठेवावे लागेल.

नेहमी एका ओळीत पेरणी करा आणि वेलवर्गीय पिकांना देखील एकाच वाफ्यात लावा जेणेकरून उत्पादनात वाढ होईल. भाजीपाला लागवड करायचा असेल तर आंतरपीक म्हणून फळांच्या बागेत लागवड करा, जेणेकरून पिकातून चांगले उत्पादन घेता येईल आणि अधिक नफा मिळू शकेल.

वेलीवर्गीय भाज्यांची फळे वेळेआधी गळून पडतात आणि तुटतात हे तुम्ही सर्वांनी अनेकदा पाहिले असेल. हे टाळण्यासाठी, पेरणीच्या वेळी, आपण सुमारे 40 ते 50 सेंमी रुंद आणि 30 सेमी खोल नाले बनवावेत.

याशिवाय, प्रत्येक रोपामध्ये किमान 60 सेमी अंतर ठेवावे लागेल. शक्य असल्यास, नाल्यांच्या काठावर 2 मीटर रुंद बेड तयार करा. अशा प्रकारे तुम्ही फळे अकाली पडण्यापासून रोखू शकता आणि साहजिक पिकापासून अधिक उत्पादन मिळवू शकता.