अहमदनगर ब्रेकिंग : 4 रुग्ण झाले कोरोनामुक्त; आज डिस्चार्ज,आतापर्यंत ४० जण झाले कोरोनामुक्त !

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि आरोग्य यंत्रणा करत असलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे चित्र दिसत आहे. आज जामखेड येथील ०४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.आज या रुग्णांना बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ४० झाली … Read more

मुख्यमंत्र्यांसाठी कोंग्रेसने सोडली विधानपरिषदेची जागा,परंतु त्या बदल्यात घेतले ‘येवढे’ सारे

मुंबई : विधानपरिषदेसाठी  दोन जागा लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या काँग्रेसमुळे शिवसेनेची गोची झाली असती. परंतु आता काँग्रेसने शेवटच्या एक जागा लढवण्याच मान्य केलं. परंतु या एका जागा गमावल्याच्या बदल्यात मात्र काँग्रेसने बरचं काही कमावलं. महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरलाय असं काही- – सत्तावाटपात काँग्रेसचा यापुढे सन्मान राखला जाईल – यापुढे सत्ता वाटप करताना संख्याबळाचा विचार केला जाणार … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील संकट टळले ;होणार बिनविरोध आमदार

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले परंतु त्यांना दोन्ही सभागृहांपैकी एका सभागृहाचा सदस्य होणे गरजेचे होते. त्यानुसार विधानपरिषदेसाठी तशी तयारी सुरु झाली. परंतु काँग्रेसमुळे अडचण उभी राहिली होती परंतु आता काँग्रेसने आपला दुसरा उमेदवार मागे घेतल्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. उद्धव ठाकरे यांचा आमदार व्हायचा मार्ग सुकर झाला आहे. विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी भाजपने … Read more

१७ मेनंतर लॉकडाऊन नाही, सरकार आखणार हे धोरण ?

नवी दिल्लीः कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू केले होते. त्यामुळे बर्‍यापैकी कोरोनाला आळा घालण्यात यश मिळाले. आता १७ मे ला लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपणार आहे. त्यानंतर सरकार काही पाउल उचलणार आहे? सरकार आता पूर्ण जिल्हा किंवा शहरात निर्बंध न घालता फक्त हॉटस्पॉट असलेले भाग सील करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. … Read more

एका चुकीने नियंत्रणात आलेल्या कोरोनाचा पुन्हा उद्रेक

नवी दिल्ली: दक्षिण कोरिया आणि जर्मनी या दोन देशांनी कोरोना विषाणूसंदर्भात खूपच दक्षता घेतली. अथक प्रयत्न करत हे दोन्ही देश कोरोनाव्हायरसवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाले. या दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना टेस्टिंग करण्यात आलं होतं, शिवाय कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही करण्यात आलं. ज्यामुळे या ठिकाणी कोरोनामुळे जास्त मृत्यू झाले नव्हते. मात्र त्यांची एक चूक चांगलीच … Read more

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २२ हजार १७१ !

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २२ हजार १७१ झाली आहे. आज १२७८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ३९९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात  ४१९९ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ३८ हजार ७६६ … Read more

तंबाखू, सुपारी व पान मसाला सेवन करणे आणि थुंकण्यावर बंदी !

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :- कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असतानाच २८ राज्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानरहित तंबाखू, सुपारी व पान मसाला सेवन करणे आणि थुंकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. थुंकीच्या लाळेतून कोरोनाचा प्रसार होत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढणाऱ्या महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश, आसाम आणि दिल्लीसह अनेक … Read more

धक्कादायक : लॉकडाऊनमध्ये सूट देणाऱ्या देशांत कोरोनाची दुसरी लाट येतेय !

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :- लॉकडाऊनमध्ये सूट देणाऱ्या देशांत आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यामुळे दक्षिण कोरियावर २१०० हून अधिक बार व नाईट क्लब बंद करण्याची वेळ आली आहे. जर्मनीलाही आपले कत्तलखाने बंद करावे लागले आहेत. इटलीतही नागरिकांनी ‘विकेंड’च्या सुट्टीत भाऊगर्दी केल्याने प्रशासनाची काळजी वाढली आहे. चीन, दक्षिण कोरिया, इटली आदी अनेक देशांनी … Read more

कोणीही उपाशी राहू नये, यासाठी मदत केली पाहिजे – आमदार राधाकृष्ण विखे

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :- सर्वसामान्य, गोर-गरीबांना लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने करोनाच्या महामारीत उपासमारीची वेळ आली आहे. गावातील पुढाऱ्यांनी गटातटाचे राजकीय जोडे बाजूला ठेवून या महामारीत एकमेकांना माणुसकीच्या धर्माने कोणीही उपाशी राहू नये, यासाठी मदत केली पाहिजे, असे आवाहन माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी केले. तालुक्यातील तीन ठिकाणी मोफत अन्नछत्राचे आमदार राधाकृष्ण विखे … Read more

सुपा एमआयडीसीतील कामगाराची आत्महत्या

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :- पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगीक वसाहतीमधील परप्रांतिय कामगाराने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विनायक कन्हार (रा. ओडिसा) असे कामगाराचे नाव आहे. याबाबत सविस्तर असे की, पारनेर तालुक्यातील सुपा येथील औद्योगिक वसाहतीत अनेक मोठमोठ्या कंपन्या आहेत. त्यातील सूरज बिल्डकॉन या कंपनीतील विनायक कन्हार रा.ओडीसा हा काम करत होता. याने वाघुंडे गावात … Read more

होय ! मालकाचे प्राण वाचविण्यासाठी कुत्र्याने केली वाघाची शिकार….

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :-  संगमनेर तालुक्यातील वाघापुर गावात कुत्र्याने चक्क वाघाचा पाठलाग केल्याची अजब व आश्चर्यचकीत प्रकार पहायला मिळाला. संगमनेर शहरालगत असणार्‍या वाघापूर येथे गव्हाळी वस्तीवर अण्णासाहेब लहानू शिंदे यांच्या घराजवळ सकाळच्या सुमारास बिबट्याचे बछडे निदर्शनास आले. त्याक्षणी घरातील कुत्र्याने त्या बछड्याचा पाठलाग केला. आणि बछडे सरासर शेवरीच्या झाडावर चढले. हे कुत्रे त्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगराध्यक्षांची नागरिकांवर दहशत करून हुकूमशाही !

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :-  देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात लॉकडाऊनच्या नावाखाली नगराध्यक्ष सत्यजित कदम शासकीय कामात हस्तक्षेप करत नागरिकांवर दहशत निर्माण करून हुकूमशाही गाजवित आहेत. याची चौकशी करून संबंधित नगराध्यक्ष व त्यांच्या हस्तकांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य अजित कदम यांनी केली आहे. राहुरी फॅक्टरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेतीच्या वादातून डोक्यात कुऱ्हाड घालून खून !

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :- कौठेकमळेश्वर येथे शेतीच्या वादातून डोक्यात कुऱ्हाड घालून एकाचा भरदिवसा खून झाला. सतीश छबू यादव (३६ वर्षे) असे मृताचे नाव आहे. रविवारी दुपारी अडीच-तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथील सतीष यादव यांना दुपारच्या वेळी घरातून बोलावून घेत शेतीच्या वादातून मारहाण करण्यात आली. डोक्यात कुऱ्हाड घातल्याने ते … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा पुन्हा हादरला,अंगावर ट्रॅक्टर घालून एकाचा खून !

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- अहमदनगर जिल्हा पुन्हा खुनाच्या घटनेने हादरला आहे,पाथर्डी तालुक्यातील अकोला गावात येथे किरकोळ वादातून पुतण्याने सख्या चुलत्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जागीच ठार केले आहे. ही घटना आज दुपारी घडली आहे. वादाचे कारण अद्याप समजले नसून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे,घटनेतील मयत बाबासाहेब व संशयीत आरोपी तुळशीराम हे एकमेकांचे साडू आहेत. … Read more

अहमदनगर जिल्हातील दुकाने आणि आठवडे बाजाराबाबत नवा आदेश

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- अहमदनगर जिल्हा महसुल स्थळ सीमेच्या हद्दीतील कंटेंटमेंट झोन वगळता महानगरपालिका, नगरपालिकाहदीतीन एकल (stand alone), वसाहती लगत असणारी, निवासी संकुलामधील सर्व दुकाने सुरु राहतील. तथापि याची काटेकोर अंमलबजावणी आणि नियोजन करण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक प्राधिकरण यांची राहील, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. यापूर्वी जिल्हा प्रशासनाने नागरी … Read more

‘या’ कारणामुळे जिल्ह्यातील गुन्ह्यांची संख्याही वाढली …

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- दिवसेंदिवस लॉकडाऊन शिथील होत आहे त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील गुन्ह्यांची संख्याही वाढतांना दिसत आहे. त्यामुळे खून, खुनाचे प्रयत्न करणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांसह हाणामारी व इतर किरकोळ गुन्ह्यात वाढ होऊ लागली आहे. जिल्हयात गेल्या दीड महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्वत्र पोलीस रस्त्यावर असल्याने नागरिक घातच बसलेले होते . त्या काळात गुन्ह्यांची संख्याही … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी ०१ जण कोरोनामुक्त, वाचा आजचे कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- जिल्ह्यातील नेवासा येथील ०१ कोरोनामुक्त होऊन आज घरी परतला. आज या रुग्णाला बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ३६ झाली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित व्यक्तींची संख्या ५३ असून त्यापैकी आता १४ जणांवर उपचार सुरू असून ०३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, अशी … Read more

धक्कादायक : कुट्टी मशिनमध्ये अडकून महिलेचा मृत्यू !

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- राहरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील तरुणी अलका शिवाजी मंडलिक , वय ३१ हिचा कुट्टी मशिनमध्ये पदर अडकून जखमी झाल्याने नगरच्या नोबेल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना अलका या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी डॉक्टरांच्या खबरीवरुन राहरी पोलिसात अमृनं . ४७ दाखल करण्यात आला असून पोना कारेगावकर … Read more