कांदा @ १८०० रुपये

गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण होत आहे. बाजारपेठेत कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे दर आता दोन हजारांपर्यंत आले आहेत. राहुरी बाजार समितीत शुक्रवारी कांदा लिलाव घेण्यात आले. या लिलावात एक नंबर कांद्याला सरासरी १ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला. काही दिवसांपासून राहुरी बाजार समितीत कांद्याचे दर कमी होत आहेत. शुक्रवारी लिलावात एक … Read more

पदवीचा उपयोग समाज उभारणीसाठी करा : आमदार आशुतोष काळे

कोपरगाव :- पदवीचा उपयोग स्वत:बरोबरच समाज उभारणीसाठी करा, असा सल्ला आमदार आशुतोष काळे यांनी स्नातकांना दिला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पाचवा पदवीग्रहण समारंभ काळे महाविद्यालयात झाला. या वेळी आमदार काळे म्हणाले, जगाच्या पाठीवर एकूण लोकसंख्येच्या ४० ते ४५ टक्के युवा वर्ग आजमितीला कोणत्याही देशाकडे नाही. २०२० पर्यंत आपण देशाच्या प्रगतीचे स्वप्न पहात होतो. मात्र, हे … Read more

अहमदनगर मध्ये कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण; जाणून घ्या कोरोना व्हायरसची लक्षणे कोणती, किती धोकादायक?

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळला असल्याची माहिती समोर आली आहे. नेवासा येथे राहणारा एका २५ वर्षीय तरुणाला कोरोना व्हायरसची लागण झाली असण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी या तरुणाच्या रक्ताचे व घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविले आहेत. या व्हायरसविषयी सातत्याने येत असलेल्या बातम्यांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण … Read more

राज्यात भाजपचे सरकार स्थापन होईपर्यंत महाराष्ट्र सोडून जाणार नाही

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  मी मैदान सोडून पळणाऱ्यातला नाही. महाराष्ट्रात पुन्हा भाजपचे सरकार येणार नाही तोपर्यंत मी महाराष्ट्र सोडून कुठेही जाणार नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले. तसेच ठाकरे सरकार विश्वासघातकी असल्याने ते टिकणार नाही, असेही त्यांनी म्हटले. मुंबईत शनिवारी विनायक मेटे यांच्या शिवसंग्रामचा १७ वा वर्धापन दिन फडणवीस यांच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल !

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळला असल्याची माहिती समोर आली आहे.नेवासा येथे राहणारा एका २५ वर्षीय तरुणाला कोरोना व्हायरसची लागण झाली असण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी या तरुणाच्या रक्ताचे व घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविले आहेत. रिपोर्ट आल्यानंतर त्याला या व्हायरसची लागण झालेली आहे की नाही … Read more

शरद पवार यांच्या हत्येचा कट ? पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्यासह वेब पोर्टल विरोधात तक्रार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार पुणे पोलिसांकडे दाखल झाली आहे.शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल झाली आहे. या तक्रारीतून आरोपींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची तक्रार दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिवाजी​नगर पोलीस … Read more

रणबीर-आलियाचं शुभमंगल!

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- रणबीर आणि आलियाने चक्क लग्न करायचं मनावर घेतलंय आणि तेही याच वर्षी! यो दोघांचं रिलेशनशिप उत्तम असलं, तरी ते दोघं सध्या तरी करिअरकेड लक्ष देतील असं अनेकांना वाटत होतं, पण जर्नलिस्ट राजीव मसंद यांनी ‘ओपन मॅगझिन’साठी घेतलेल्या मुलाखतीत दोघांनी हे गुपित उघड केलंय. डिसेंबरमध्ये लग्न करण्याचा दोघांचा विचार असून घरच्यांशीही … Read more

कोरोना व्हायरसमुळे चायनीज आणि चिकन ला बुरे दिन

करोना व्हायरसच्या भीतीमुळे सध्या चिकनच्या मागणीत घट झाली आहे. नागरिकांनी चिकन घेणे कमी केले आहे. या दिवसात चिकनची विक्री निम्म्याने घटली आहे. चीनसह अन्य देशांत फैलावलेल्या करोना व्हायरसची नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. या भीतीपोटी चायनीज फास्ट फूडची मागणी घटली आहे.  नागरिकांकडून चायनीज फूड खाणे टाळले जात आहे. त्यामुळे चायनीज खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर गर्दी कमी झाली … Read more

राज्‍यातील तमाशा कलावंतांना संरक्षण द्या. – माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांची मुख्‍यमंत्र्यांकडे मागणी

नाशिक जिल्‍ह्यातील साकुर येथे तमाशा कलावंतांवर झालेला हल्‍ला पुरोगामी महाराष्‍ट्राच्‍या दृष्‍टीने निंदनिय असुन, या घटनेचे गांभिर्य ओळखुन राज्‍य सरकारने दोषी व्‍यक्तिं विरोधातील खटला जलदगती न्‍यायालयात चालवावा आणि राज्‍यातील तमाशा कलावंतांना संरक्षण द्यावे अशी मागणी माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी मुख्‍यमंत्र्यांकडे केली आहे. या संदर्भात मुख्‍यमंत्र्यांना आ.विखे पाटील यांनी पाठविलेल्‍या पत्रात म्‍हटले आहे की, नाशिक जिल्‍ह्यातील … Read more

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला त्रास देणाऱ्या रोमिओचे नागरिकांनी केले ‘हे’ हाल !

अहमदनगर : अल्पवयीन मुलीला छेडछाड केल्याचा प्रकार शहरात आज भर दुपारी अडीच वाजता घडला आहे. या रोडरोमिओची नागरीकांनी चांगलीच धुलाई केली.  मुलीला कॉलेजला जात असताना हा रोमिओ नेहमी तिची छेड काढायचा. आजही हा रोमिओ छेड काढत होता. अल्पवयीन मुलगी रस्त्याने जात असताना तिच्या दिशेने चिठ्ठी फेकणे, इशारे करणे असे प्रकार हा रोमिओ करायचा. पाठलाग करण्यासारखे ही … Read more

पोटनिवडणुकीत फक्त शिवसेनेचा ‘पराभव’ नाही, अनिल राठोडांसह शिवसेनेने ‘हे’ गमाविले आहे !

अहमदनगर :- महापालिकेच्या पोटनिवडणूक निकालाचा दुहेरी फटका शिवसेनेला बसला आहे. निवडणुकीत हार पत्करावी लागल्याने आपल्याकडे असलेली जागा गमवावी लागलीच व आता महापालिका स्थायी समिती तसेच महिला व बालकल्याण समितीतील प्रतिनिधित्वही प्रत्येकी एका सदस्याने कमी झाले आहे. महापालिका स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीमध्ये प्रत्येकी १६ सदस्य असतात. महापालिकेचे ६८ नगरसेवक असल्याने या सदस्य संख्येने … Read more

श्रीरामपूरमध्ये शाळकरी मुलीचा विनयभंग

श्रीरामपूर :- येथील कन्या विद्यालयात शिकणाऱ्या पंधरा वर्षांच्या विद्यार्थिनीला शाळेतून घरी जाताना त्रास देणाऱ्या संदीप कांबळे (डुडे, रामनगर वॉर्ड १) या तरूणाविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्रासलेल्या विद्यार्थिनीने फिर्यादीत म्हटले आहे, विद्यालयातून घरी जात असताना कांबळे पंधरा दिवसांपासून त्रास देत होता. गुरुवारी सायंकाळी त्याने आवाज दिला, पण आपण त्याच्याकडे पाहिले … Read more

१०० किलोमीटर प्रवासासाठी फक्त ६० रुपये खर्च… चीनची ही खास कार भारतात होणार लॉंच

शुक्रवारपासून सामान्यांना ऑटो एक्सपो २०२० खुला झाला आहे, दरम्यान दोन दिवसांत ५० पेक्षा जास्त गाड्यांचे लाँचिंग झाले असून ऑटोमोबाईल कंपन्या त्यांच्या विविध कार्स या प्रदर्शनात मांडत असते. हायमा बर्ड या चीनच्या कंपनीने भारतात हायमा इलेक्ट्रिक ई 1 लाँच करणार आहे, याची किंमत 10 लाखांपेक्षा कमी असू शकते. हायमा बर्ड ची हीच ई 1 ईव्ही इलेक्ट्रिक … Read more

या कारणामुळे महाविकास आघाडीचा प्रयोग फसला….

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सहामधील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पल्लवी जाधव यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार अनिता दळवी यांचा १ हजार ७१२ मतांनी पराभव केला. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने स्थानिक पातळीवर करण्यात आलेला महाविकास आघाडीचा प्रयोग फसला. महापालिकेत राष्ट्रवादीने बाहेरून दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर भाजप सत्तेत आहे. असे असतानाही राज्याच्या धर्तीवर नगर शहरात महाविकास आघाडीचा प्रयोग राबवण्यात आला. काँग्रेस, राष्ट्रवादी … Read more

अभिनेत्री मानसी नाईकची छेड काढल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा

मुंबई :- अभिनेत्री मानसी नाईकची छेड काढणाऱ्या तिघांविरोधात साकीनाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानसी ५ फेब्रुवारी रोजी पुण्यात कार्यक्रम सादर करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्यासाेबत छेडछाडीची घटना घडली होती. मानसी नाईक पुण्यातील शिरुर तालुक्यात रांजणगाव येथे एका वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रमासाठी गेली होती. त्यावेळी कार्यक्रम सादर करत असताना एका अज्ञात व्यक्तीने तिच्यासोबत गैरकृत्य केले. तसेच … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची निर्घृण हत्या

सांगली :- कवठेमहांकाळ पंचायत समितीचे माजी सभापती व महांकाली साखर कारखान्याचे संचालक व राष्ट्रवादीचे नेते मनोहर पाटील यांची अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली. या आठवडयात राष्ट्रवादीच्या नेत्याची हत्या होण्याची ही सांगलीतील दुसरी घटना आहे. या घटनेमुळे सांगलीत एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा … Read more

या जाहिरातींवर सरकार आणणार बंदी !

ग्राहकांची दिशाभूल करण्यासाठी खोटे दावे करणाऱ्या जाहिरातींवर बंदी आणण्यासाठी केंद्र सरकार आता नवीन कायदा मंजूर करणार आहे. आरोग्य मंत्रालयाने यासाठी आक्षेपार्ह जाहिराती कायदा १९५४ मध्ये दुरुस्तीचा मसुदा सादर केला आहे. यात चमत्कारातून केले जाणारे उपचार, गाेरेपणा, उंची, लैंगिक क्षमता, मेंदूची क्षमता वाढवणे आणि वार्धक्य रोखण्याच्या जाहिराती दिल्यास ५ वर्षांची कैद व ५० लाख रुपयांपर्यंत दंडाची … Read more

नोकरीसाठी कुठल्याही पुढाऱ्याच्या दारात फिरू नका !

टाकळीभान :- नोकरीसाठी कुठल्याही पुढाऱ्याच्या दारात फिरू नका, असा सल्ला टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित सन्मान कार्यक्रमात सेवानिवृत्त कर्नल राजेंद्र धुमाळ यांनी दिला. धुमाळ म्हणाले, शाळेत मी सर्वसाधारण विद्यार्थीच होतो. महाविद्यालयात गेल्यावर मी ठरवलं की, मला काय व्हायचं आहे. मनात ठरवलं, तर काहीही होऊ शकतं. नोकरी करत असताना … Read more