प्रेमसंबंध ठेव म्हणत प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ‘प्रेमसंबंध ठेव’ म्हणत श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील असिफ कबीर पठाण या तरुणाने राहुरी विद्यापीठाच्या उजव्या कालव्याजवळ विवाहित महिलेवर धारदार शस्त्राने सपासप वार करत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत ती महिला गंभीर जखमी झाली. एखाद्या फिल्मी ‘लवस्टोरी’लाही लाजविणारी ही घटना रविवारी सायंकाळी घडली.  प्रेयसीवर धारदार सुऱ्याने वार करून फरार … Read more

‘संजू तू हल्ली बरा बोलतो, येतो का पक्षात? – राज ठाकरे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रकाराला व्यासपीठावरुनच पक्षात येण्याची ऑफर दिली. झील संस्था आणि कार्टुनिस्ट कंबाईन यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी इंक अलाईव्ह या कार्यशाळेचं आयोजन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात राज ठाकरे आपलं मनोगत व्यक्त करताना व्यंगचित्रकाराला ‘येतो का पक्षात?’ असं म्हणाले आणि सभागृहात एकच हशा … Read more

काँग्रेसच्या नेत्याने केली मुलाची गोळी झाडून हत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ अकोला: वडिलांच्या तक्रारीवरूनच आपल्याला पोलिसांनी तडीपार केले, अशा संशयावरून मुलाने वडिलांशी वाद घातला. दोघांत झालेल्या झटापटीत वडिलांनी मुलावर बंदुकीतून गोळी झाडली. त्यात मुलाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे मुलगा गुंड प्रवृत्तीचा असल्याने कुटुंबीय त्याला त्रस्त होते. ही घटना अकोल्यातील जठारपेठेत सोमवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली. मनीष भारती (४०) असे मृत मुलाचे … Read more

अरविंद केजरीवाल म्हणजे दहशतवादी!

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करताना केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दहशतवादी म्हटले आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, की दिल्लीचे मुख्यमंत्री एक दहशतवादी आहेत. ते लोकांना निरागस चेहरा करून विचारतात, मी दहशतवादी आहे का? प्रत्यक्षात ते दहशतवादीच आहेत असे जावडेकर म्हणाले … Read more

के के रेंज विस्तारीकरणाबद्दल राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणतात…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगर, राहुरी आणि पारनेर तालुक्यातील के. के. रेंजमध्ये समाविष्ट असलेल्या जमिनींसंदर्भात पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.  यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आर्मर्ड कॉर्पस् सेंटर अँड स्कूलचे लेफ्टनंट कर्नल रोहित वाधवान, निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे उपस्थित होते. लेफ्टनंट कर्नल वाधवान यांनी रेंज एक व दोनमध्ये समाविष्ट जमिनींविषयीची … Read more

ट्रकखाली चिरडून पादचाऱ्याचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भरधाव ट्रकखाली पादचाऱ्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक पळून गेला. रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास कोळपेवाडी साखर कारखान्याच्या गट ऑफिससमोर हा अपघात झाला. संजय रघुनाथ चव्हाण (वय ३९, कोळपेवाडी) हे रस्त्याने पायी जात असताना पाठीमागून आलेल्या ट्रकची (एम एच १७ ए ६०८९) त्यांना धडक बसली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत नानासाहेब रघुनाथ … Read more

प्रवरा पतसंस्थेच्या संचालकांवर गुन्हे दाखल करा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अवसायनात निघालेली पूर्वश्रमीची रावसाहेब पटवर्धन व आताची प्रवरा नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकानी राजीनामे दिलेले आहेत , त्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी मिळणे अवघड झाले आहे. सदर पतसंस्थेच्या ठेवीदारांनी निवेदन द्वारे संचालकांवर (महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंध संरक्षण) अंतर्गत गुन्हे करावेत, अशी मागणी ठेवीदार कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. सहकार विभागाचे जिल्हा उपनिंबधक दिग्विजय … Read more

अजित पवारांच्या ‘कारखान्याचे’चे दूषित पाणी ओढ्यात

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक येथे असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंबालिका साखर कारखान्याचे रसायन व मळीमिश्रित सांडपाणी थेट कारखान्याजवळील ओढ्यामध्ये सोडण्यात आल्याने पाणी दुर्गंधीयुक्त झाले आहे. या पाण्यामुळे खालच्या भागातील गावे वस्त्यांवरील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाण्यातील मासे व इतर जलचरही मृतावस्थेत आढळून येत आहेत. हा ओढा पुढे भीमा … Read more

धक्कादायक: शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / वर्धा : हिंगणघाट शहरात एका शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधामाला अखेर अटक केली आहे. विक्की नगराळे असे या आरोपीचे नाव असून त्याला वर्धा जिल्ह्यातील टाकळघाट परिसरातून अटक करण्यात आली आहे. हिंगणघाट शहरात आज (3 फेब्रुवारी) सकाळी साडे सातच्या सुमारास एका शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला … Read more

मतीमंद महिलेवर दोघांचा बलात्कार 

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव: तालुक्यातील खडकी परिसरात राहणारी एक ३४ वर्षाची महिला तिच्या घराजवळील शेडमध्ये असताना दुपारी १२च्या सुमारास सदर महिला मतीमंद असल्याचा गैरफायदा घेत जालिंदर कचरु त्रिभुवन, वय ४०, रा. खडकी याने तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. शेजारील शेडमध्ये नेऊन हा अत्याचार करण्यात आला. तर सायंकाळी ३.४५ च्या सुमारास आरोपी नवनाथ उर्फ रवी … Read more

राज्यातील या जिल्ह्यांत पावसाची शक्यता,वाचा हवामान खात्याचा अंदाज

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- हिवाळा चालू असताना राज्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.थंडीचा पारा घसरून येत्या आठवड्यात विदर्भात काही भागांत विजेच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे.  येत्या 24 तासांत नागपूर, नाशिक, गडचिरोली, यवतमाळ, बीड आणि नांदेड या शहरांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता स्कायमेटने वर्तविली आहे. अगले एक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बिबट्याने तोडला मुलाचा कान

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी: राहुरी तालुक्यातील पिंपळगाव फुणगी येथे काही तासापूर्वी तीन वर्षाच्या चिमुकलीचा कान तोडून बिबट्याने धूम ठोकली. श्रेया मंजाबापू जाधव असे, या चिमुकलीचे नाव आहे. दरम्यान, श्रेयाला अहमदनगर जिल्हा सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कानासह तिच्या गालावरही गंभीर जखमा झाल्या आहेत. पिंपळगाव फुणगी येथे गव्हाच्या शेतात बिबट्याच्या पावलांचे ताजे निशाण … Read more

तर मुंबईत फिरणं अशक्य होईल, जयंत पाटील यांचा आशिष शेलार यांना इशारा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ मुंबई : भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यानंतर महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून भाजपला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजप ज्यांचा बाप काढत आहे, त्यांनी मनात आणलं तर मुंबईत फिरणं अशक्य होईल, असा थेट इशारा दिला आहे. जयंत पाटील म्हणाले, “भाजपनं … Read more

म्हणून आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांची मागितली माफी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / मुंबई: आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एकेरी उल्लेखाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्या वक्तव्याबद्दल आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माफी मागितली. “मुख्यमंत्री महोदयांचा एकेरी उल्लेख केलेला नाही. कुठल्याही राजकीय नेत्याचा वैयक्तिक उल्लेख केलेला नाही. ती आमची संस्कृती, प्रथा परंपरा नाही. आम्ही सवाल उपस्थित केला आहे त्यावर … Read more

तरुणीचा ‘अर्धवट’ जळालेला मृतदेह आढळला , सर्वत्र खळबळ

अहमदनगर लाईव्ह 24 टीम:- एका तरुणीचा हात-पाय बांधलेला अर्धवट जळालेला मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशमधील रायबरेली येथे घडली. मृत तरुणीची ओळख झाली असून ती बछरावाच्या बाजारपेठेत राहणारी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दोन दिवसांपासून मृत तरुणी कॉलेजमधून बेपत्ता होती. तरुणी विधानपरिषद आमदार प्रताप सिंह यांच्या भावाच्या कॉलेजमध्ये एमएससीमध्ये शिकत होती. काल (2 फेब्रुवारी) हरचंदपूर पोलीस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दरोडेखोर आणि पोलिसांत झाली धुमश्चक्री !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या श्रीरामपूर आणि गुरूधानोराचे दरोडेखोर व गंगापूर पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत पोलिसांनी हवेत गोळीबार केला. यावेळी दरोडेखोरांनी पोलिसांवर केलेल्या दगडफेकीमध्ये पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे हे जखमी झाले असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही घटना औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर भेंडाळ्याजवळ घडली. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास महामार्गावर पाच दरोडेखोर घातक … Read more

पाटाच्या पाण्यात तरुणाचा मृतदेह आढळला

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं 3 मधील साईनगर बाजारतळ परिसरात पाटाच्या पाण्यात नाऊर येथील एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. गणेश आप्पासाहेब शिंदे (वय 21) असे मयत तरुणाचे नाव आहे. काल रविवार दि. 2 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास शहरातील नॉर्दन ब्रँच परिसरात पाटाच्या पाण्यामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रॅक्टर शेतकर्‍यासह विहिरीत पडल्याने शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नाशिक जिल्ह्यातील मालेगाव-देवळा रस्त्यावर एसटी बस आणि रिक्षाची जोरदार धडक होऊन दोन्ही वाहने विहिरीत कोसळली. या घटनेत 26 जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच अहमदनगर जिल्ह्यातही असाच प्रकार घडलाय. कर्जत शहरापासून 2 किमी अंतरावर असलेल्या जामदारवाडा येथे मोहनराव लाढाणे या शेतकर्‍याच्या विहिरीमध्ये टॅक्टरसह पडून कानिफनाथ रामदास बळे (वय 22) … Read more