बिबट्याचा शेळीवर हल्ला, ठसे आढळल्याने …

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील सरगडवस्तीवर गुरुवारी रात्री बिबट्याने शेळीवर हल्ला केला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. जवखेडे परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांना भीतीचे वतावरण आहे. सरगरवस्ती परिसरात पिंजरा लावण्यात येणार आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी सावध राहण्याचे आवाहन तिसगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुलकर यांनी केले आहे. … Read more

लग्नघरातून आठ लाखांच्या मुद्देमालाची चोरी,सीसीटीव्हीत चोरटे कैद

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- कुकाणा येथील शामसुंदर धोंडीराम खेसे यांचे घरातून चोरट्यांनी सोन्याच्या २३ तोळे दागिन्यांसह रोख ६५ हजार रुपये असा एकूण ८ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज पळवला. काल शुक्रवारी रात्री एक वाजेच्या सुमारास चोरीचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. खेसे यांच्या मुलाचे रविवारी लग्न आहे. त्यामुळे त्यांच्या घरासमोर मंडप टाकलेला … Read more

रस्त्यासाठी ४ कोटी निधी मंजूर ! आ. काळे यांची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :-महाआघाडी सरकारच्या माध्यमातून यश मिळत असून मतदारसंघातील जिल्हा हद्द रस्त्याच्या (प्रजिमा ५) १६ किलोमीटर अंतराच्या नूतनीकरणासाठी ४ कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. याबाबत पत्रकात आमदार काळे यांनी म्हटले, की कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट … Read more

आ. आमदार विखेंच्या प्रयत्नांनी फळउत्पादकांना दिलासा

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेतील प्रमाणकांमध्­ये (ट्रीगर) तातडीने बदल करावेत, या माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्­या मागणीची मुख्­यमंर्त्यांनी दखल घेतली असून या योजनेतील जाचक अटी रद्द करण्­याचा निर्णय घेतल्­याने फळपीक उत्­पादकांना दिलासा मिळून या योजनेत सहभाग घेण्­याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्­य सरकारने पुनर्रचीत हवामान आधारित … Read more

डॉ. तनपुरे कारखाना सुरू करण्यास जिल्हा बँकेची परवानगी !

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू करण्यास जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने परवानगी दिली असल्याची माहिती ज्येष्ठ संचालक माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दिली. जिल्हा सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाची मासिक बैठक काल अहमदनगर येथे झाली. तीत हा निर्णय घेण्यात आला. राहुरी येथील डॉ. तनपुरे सहकारी साखर … Read more

मास्क न घालणारे नागरीक व व्यापाऱ्यांवर कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- नेवासा शहरात मास्क न घालणाऱ्या नागरिकांसह व्यापाऱ्यांवर नगरपंचायतचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांच्या नेतृत्वाखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली. अजून कोरोना गेलेला नाही, नियमांचे पालन करा, असे आवाहनही नगरपंचायतच्या टीमकडून करण्यात येत होते. मास्क नसणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी मुख्याधिकारी गर्कळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधिकारी गुप्ता, वाघमारे, कडपे, कार्यालयीन कर्मचारी … Read more

वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- राहाता तालुक्यातील हनमंतगाव शिवारात लोणी- सोनगाव रस्त्यावर असलेल्या स्वातंत्र्य चौकात असलेल्या ब्राम्हणे- बनसोडे वस्तीजवळ शनिवारी (दि. १९) सकाळी ६ वाजेच्या सुमारास बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. अज्ञात वाहनाच्या धडकेने हा एक वर्षाचा नर बिबट्या मृत झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. लोणी, कोल्हार, सात्रळ, सोनगाव, पाथरे, हनमंतगाव या प्रवरा पट्ट्यातील … Read more

… तर चालू हंगामात शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळू शकते

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- कोरोनाचे संकट दूर होत असतानाच शेतकरी राजाला वेध लागलेत ते खरीप हंगामाचे. अकोले तालुक्यातील आदिवासी पट्टयामध्ये सर्वदूर खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये भात,नागली,वरई आदी बियाणे पेरून रोपवाटिका तयार करण्यास सुरुवात केली आहे. शेतकरी वरुण राजाची आतुरतेने वाट पाहत आहे. रोपे तयार होण्यासाठी आणि त्यांची … Read more

अगस्तीचा हंगाम सुरू करण्यासाठी संपूर्ण सहकार्य

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- अगस्तीचा गाळप हंगाम सुरू करण्यासाठी संपूर्ण सहकार्य म्हणून प्रबोधन मोहिमेला तात्पुरती स्थगिती देत असून व्यवस्था परिवर्तनाची लढाई मात्र नेटाने पुढे घेऊन जाणार असल्याचे समन्वय समितीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांचा बैठकीत जाहिर केले. येथील शासकीय विश्रामगृहावर पार पडलेल्या बैठकीस आ.डॉ किरण लहामटे,जेष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत,बी.जे.देशमुख कारभारी उगले,बाजीराव दराडे,मारुती मेंगाळ,पोपट येवले,विनय … Read more

मराठा आरक्षण : पोलिसांनी परवानगी नाकारली तरी सोलापुरात ४ जुलैला उग्र मोर्चा काढणार

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- मराठा आरक्षणासाठी 4 जुलै रोजी सोलापूरात उग्र मोर्चा काढणार आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी मोर्चा काढूच, असा इशारा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडाळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिला. नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या मोर्चाची माहिती दिली. या मोर्चात मराठा समाजच नाही तर शेतकरीही सहभागी होणार … Read more

चिंता वाढली : महाराष्ट्रात आढळले डेल्टा-प्लस व्हेरिएंटचे सात रुग्ण; पाच रुग्ण एकाच जिल्ह्यातील

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- महाराष्ट्रात SARS-CoV-२ डेल्टा-प्लस व्हेरिएंटचे सात रुग्ण आढळून आले. यपैकी पाच रुग्ण हे रत्नागिरी जिल्ह्यात आढळून आले आहेत. आम्हाला नवी मुंबई, पालघर आणि रत्नागिरीमध्ये डेल्टा-प्लस सापडला. त्यानंतर, आम्ही आणखी नमुने पाठविले, परण अंतिम अहवाल अपेक्षित आहे, असे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (डीएमईआर) चे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी … Read more

नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबध्द: राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या समजावून घेणे आणि त्या सोडविण्याचा प्राधान्य देणे यासाठी आपण कटिबध्द आहोत, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. फळबाग विमा आणि पीक विमा संदर्भात शेतकऱ्यांच्या असलेल्या अडचणी संदर्भात … Read more

आ.रोहित पवारांना मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटतेयं’

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- आमदार झाल्यापासून रोहित पवारांना ते स्वयंघोषित मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटतेय, त्यांना ऊठसूट केंद्र सरकार दिसत आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उंची मोजू नये. त्याऐवजी स्थानिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत अशी टीका आ.गोपीचंद पडळकर यांनी केली. भाजप नेते आ.गोपीचंद पडळकर हे जामखेड तालुक्यात आल्यानंतर श्री क्षेत्र चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी … Read more

रुग्णालयांमध्ये होत असलेल्या डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- विविध शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये होत असलेल्या डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध म्हणून आयएमए या डॉक्टरांच्या संघटनेने शुक्रवारी, १८ जून हा काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. डॉक्टरांवरील हल्ले थांबवण्यासाठी कायदा पास करण्यात यावा, सर्व वैद्यकीय आस्थापना या संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करा, रुग्णालयाच्या सुरक्षेचे प्रमाणिकरण करा, हल्लेखोर व्यक्तींवरील खटले फास्ट … Read more

घरी रहा, सुरक्षित रहा व सोशल डिन्स्टन्सिंग पाळा : बिपीन कोल्हे

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- काेराेना आजाराने थैमान घातलेले आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सदर आजारामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या जीवघेण्या आजाराने तालुक्यातील अनेकांचे बळी घेतले, कोरोना लॉकडाउनमुळे आर्थिक जीवनमान अडचणीत सापडले. अशा परिस्थितीत वाढदिवस साजरा न करता संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जनतेस घरी रहा सुरक्षित रहा, … Read more

काळ्या बाजारात जाणारा स्वस्त धान्याचा साठा जप्त ! तब्बल ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- काळ्याबाजारात विक्रीसाठी आणलेला रेशनिंगच्या तांदूळ व गव्हाचा मोठा साठा कोतवाली पोलिसांनी जप्त केला आहे. शहरातील मार्केट यार्ड तसेच केंडगाव इंडस्ट्रीज इस्टेट अशा दोन ठिकाणी संबंधित व्यापाऱ्याच्या दुकान व गोदामवर शनिवारी दुपारी छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. कारवाईत धान्य व सहा वाहने मिळून सुमारे ४२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत … Read more

राजेंद्र नागवडे यांनी सभासद हिताची दखल घेतली नाही…

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना सन २०१९-२० मध्ये उसाअभावी बंद असल्यामुळे कारखान्याला तोटा झाला. तो झालेला तोटा भरून काढण्यासाठी यंदाचा गाळप हंगाम पूर्ण झालेल्या ऊस बिलाच्या माध्यमातून शासनाने जाहीर केलेली एफआरपी कमी करून द्यावी, अशी मागणी नागवडे कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी शासनाकडे करणे … Read more

सरकारी कामात अडथळा, चौघांविरुद्ध गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बागेत मोकाट जनावरे सोडल्याने पिकांचे फळपिकांचे नुकसान झाले. ते अधिक होऊ नये म्हणून ती मोकाट जनावरे पकडून ते कोंडवाड्यात घेऊन जात असताना बागेचा रखवालदारास मारहाण करण्यात आली. शिवीगाळ केली गेली. जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा वरवंडी येथील चौघाजणांविरुद्ध नोंदवण्यात … Read more