…म्हणून झाला सुजय विखेंचा विजय,आ संग्राम जगताप यांनी व्यक्त केली पराभूत होण्याची कारणे

अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघात डॉ. सुजय विखे यांचा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून झाला. धनशक्तीमुळेच त्यांना मताधिक्य मिळाले, अशी टीका नगर लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केली. शहरातून डॉ. विखे यांना मताधिक्य मिळाले असले, तरी विधानसभा निवडणूक वेगळी असून मी विधानसभेची तयारी सुरू केली असल्याचेही आमदार जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. … Read more

आ.संग्राम जगताप यांचा दारुण पराभव !

अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यात सुजय विखे यांनी बाजी मारली आहे.  आतापर्यत डॉ.विखे यांनी चौदाव्या फेरीअखेर तब्बल दोन लाखांहून जास्त मताधिक्य मिळाले आहे. त्याच बरोबर आमदार जगताप यांचे होमग्राउंडव असलेल्या नगर शहरातच भाजपच्या डॉ.सुजय विखे यांना लीड मिळाले आहे.  अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून तब्बल ४० … Read more

Live Updates : डॉ. सुजय विखे यांनी ३७ हजार २४२ मतांनी आघाडी घेतली

अहमदनगर :- तिसर्या फेरीनंतर डॉ. सुजय विखे यांनी ३७ हजार २४२ मतांनी आघाडी घेतली.तिस-या फेरीअखेर डॉ. सुजय विखे यांना ८८ हजार २६४ तर आमदार संग्राम जगताप यांना ५१ हजार २२ एवढी मते . नगर दक्षिण मतदारसंघात सुजय विखे सातत्याने आघाडीवर असून पहिल्या आणि दुसर्या फेरीत सुजय विखे यांनी २२ हजार मतांनी आघाडी घेतली आहे. डॉ. सुजय विखे … Read more

Live-updates : संग्राम जगताप Vs सुजय विखे कोण होणार खासदार ?

Loksabha Elections 2019 Results : लोकसभा निवडणूक निकाल येण्यास अवघ्या काही क्षणात सुरुवात होईल. निकालाचे अचूक आणि सुपरफास्ट अपडेट्स देण्यासाठी आमची टीमही सज्ज आहे.  वेबसाईट,मोबाईल App,Whatsapp फेसबुक, ट्विटर आणि पासून  नोटिफिकेशनद्वारे अहमदनगर Live24 व अहमदनगर Times Group तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. नगर दक्षिण निकाल पहाण्यासाठी ह्या लिंकवर क्लिक करा https://www.ahmednagartimes.com/2019/05/loksabha-results-sujay-vikhe-vs-sangram-jagtap-live-updates.html फेसबुक पेज वर निकाल पहाण्यासाठी https://www.facebook.com/ahmednagarlive24 ट्विटर अकाऊन्ट वर … Read more

कोण होणार नगरचा खासदार ? नगरकरांची उत्सुकता शिगेला !

निकालाला अवघे काही तास राहिले आहे त्यामुळे आता सर्वांच्या नजरा २३ मे कडे लागल्या आहेत. चौकाचौकात, पारा पारावर, बाजारामध्ये, चहाच्या टपरीवर जिथे कुठे माणसं भेटतील, त्या प्रत्येक ठिकाणी एकच चर्चा.. दक्षिणेत काय होईल  कोण असेल दक्षिणेचा खासदार, सुजय विखे की संग्राम जगताप? मागील तीन वर्षांपासून सुजय विखे यांनी जंग जंग पछाडले होते. डाॅ. सुजय विखे … Read more

अधिकाऱ्यांकडून उद्योजकांना त्रास,आ.संग्राम जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

अहमदनगर :- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून उद्योजकांना नाहक त्रास दिला जातो. खोट्या तक्रारी करून त्या मिटवून घेण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली जाते. याप्रकरणी उद्योजकांनी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेत सर्व प्रकार निदर्शनास आणून दिला. जगताप यांनी संबंधित अधिकाऱ्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी पाटील हे ठरावीक तक्रारदारांना हाताशी धरून … Read more

जनतेमध्ये दहशत निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार

अहमदनगर :- अधिकाऱ्याला बूट फेकून मारल्याचा प्रकार व्हीडिओवर मी पाहिला. अधिकारी, तसेच जनतेमध्ये दहशत निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा हा प्रकार आहे. यांच्याबरोबर जे लोक राहिले त्यांच्यावर केसेस दाखल होऊन उद्वस्थ झाले आहेत, अशी टीका आ. संग्राम जगताप यांनी गुरूवारी अनिल राठोड यांच्यावर केली. जगताप म्हणाले, अधिकाऱ्याला बूट फेकून मारलेला सर्वांनी पाहिला आहे. याप्रकरणी अधिकाऱ्यांनी … Read more

विखे घराण्याची दादागिरी व हुकूमशाही कायमची संपवा

संगमनेर :- काँग्रेसमध्ये सत्तेची अनेक महत्त्वाची पदे ज्यांनी सांभाळली, ज्यांनी अनेकदा स्वकियांनाच त्रास देत सहकाराच्या माध्यमातून सगळीकडे हुकूमशाही राबवली, त्यांची दादागिरी संपवण्याची हीच योग्य वेळ आहे. आम्ही दक्षिणेत योग्य इंजेक्शन दिले, आता तुम्ही निर्णय द्या, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व नगरचे उमेदवार संग्राम जगताप यांनी सांगितले. जोर्वे या आमदार राधाकृष्ण विखे यांच्या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे … Read more

डॉ. सुजय विखे विरुद्ध आमदार संग्राम जगताप यांच्यात काट्याची लढत रंगणार

अहमदनगर :- भाजपचे डॉ. सुजय विखे विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यात काट्याची लढत रंगणार आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या, तरी गप्पांच्या फडात ‘तुमच्याकडे कोण चालणार’ हाच एकमेव प्रश्न चर्चेत आहे. चतूर मतदार कल जाणून घेऊ पाहणाऱ्यांचा अंदाज ओळखून उत्तर देत आहेत. त्यामुळे कार्यकर्ते हवेत असून आपलाच उमेदवार निवडून येईल, असा विश्वास व्यक्त करत आहेत.  … Read more

देशद्रोही लोकांच्या देणग्या घेणारा खासदार हवाय का?

अहमदनगर :- ज्यांच्या संस्थेला देशद्रोही कारवाया करणाऱ्या व्यक्तीकडून देणगी मिळते, असे लोकप्रतिनिधी तुम्हाला हवा की ज्या पक्षाच्या नावातच राष्ट्रवाद आहे, त्या पक्षाच्या विचारांचा हवा. याचा विचार सर्वस्वी तुम्हीच करा, असे आवाहन नगर लेाकसभेतील राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केले. नेप्ती उपबाजार समितीच्या आवारात झालेल्या सभेत ते बोलत होते. जगताप म्हणाले, पंढरपूरचा सत्ताधारी आमदार … Read more

निवडणूकीसाठी खर्च करण्यात डॉ.सुजय विखे पहिल्या तर संग्राम जगताप दुसऱ्या क्रमांकावर….

अहमदनगर :- नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रचारासाठी सर्वाधिक खर्च केला आहे. त्यांनी आतापर्यंत 45 लाख 34 हजार 515 रुपये खर्च केले असल्याचे निवडणूक आयोगाच्या लेखा टीमने म्हटले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांनी 30 लाख 46 हजार 176 रुपये खर्च केले असल्याचे टीमने नमूद केले. … Read more

दोन युवकांना तरी नोकरी दिली का?

पाथर्डी :- शेती आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे भाजप शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात काहीच बोलत नाही. फक्त कागदावरच कर्जमाफी, दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार, प्रत्येकाच्या बँक खात्यात पंधरा लाख आदी फसव्या घोषणांची गाजरं दाखविण्याचे काम केले. दोन कोटीऐवजी दोन युवकांना तरी या सरकारने नोकरी दिली का, किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला, असा खोचक सवाल आमदार संग्राम जगताप यांनी … Read more

सुजय विखेंची दादागिरी सहन करणार नाही !

अहमदनगर :- लोणीकरांचा अन्याय आणि पंतप्रधान रोजगार मिळवण्यासाठी तरुणांना वडे भजे तळून पैसे कमवण्याचा देत असलेले फुकटचा सल्ला युवाशक्तीला अपमानित करत आहे. भाजपकडून तरुणांची होत असलेली थट्टा व लोणीकरांची दादागिरी आता युवक सहन करणार नाही, असा इशारा केदारेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी दिला. तनपुरेवाडी, अकोला, येळी, भुते टाकळी, शेकटे, येळी, खरवंडी गावातील नागरिकांशी … Read more

हिशेब मागणाऱ्यांनी माहिती घ्यावी,आ.संग्राम जगताप यांची टीका

अहमदनगर : नगर शहराचे आमदार असलो, तरी शहराबरोबरच आसपासच्या खेडेगावांच्या विकासासाठी गेल्या साडेचार वर्षांत प्रामाणिक प्रयत्न केले. नगर शहराला जोडणाऱ्या नगर तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची कामे आपण शासनाकडून मंजूर करून आणली असून त्यासाठी सुमारे १५ कोटींचा निधी प्राप्त झालेला आहे. यातील काही रस्त्यांची कामे सुरूही झाली आहेत. आपल्याला विकास कामांचा हिशोब मागणाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात … Read more

निष्ठावंत भाजप करणार संग्राम जगतापांचे काम !

श्रीगोंदा :  भाजपच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना वेगळी वागणूक देत पक्षाच्या कार्यक्रमातून कायमच बाजूला ठेवले. तालुक्यातील नेत्यांच्या या वागण्याला पालकमंत्री व खासदार यांनीही एक प्रकारे पाठबळच दिल्याने निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप करीत लोकसभा निवडणुकीप्रसंगी काँग्रेस आघाडीचे काम करण्याचा निर्णय करणार असल्याचे निष्ठावंत भाजप पदाधिकार्यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांची  शहरातील बालाजी मंगल कार्यालयात बैठक झाली . त्यात … Read more

जनतेला स्वप्ने दाखवणारे विखे पाटील २३ मार्चनंतर गायब होतील !

अहमदनगर :- ज्या लोकांनी खासदार दिलीप गांधींवर दबाव आणून नगरचे विमानतळ पळवून नेले. ते दक्षिण मतदारसंघाचा विकास काय करणार? या तालुक्यात विमानतळ झाले असते, तर मोठा विकास झाला असता. त्यांनी विमानतळ उत्तरेत पळवले. पण स्वतःचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी जागोजागी हेलिपॅड तयार केले, असा टीकेचा टोला राष्ट्रावादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी मारला. जेऊर बायजाबाई … Read more

संग्राम जगताप यांच्यासाठी राज ठाकरे अहमदनगर मध्ये !

अहमदनगर :- नगर लोकसभेची जागा भाजप व राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली आहे. खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनीच विखेंना येथून उमेदवारी दिली असल्याने त्यांचे विशेष लक्ष या मतदारसंघावर आहे. दुसरीकडे पवार यांनी डॉ. विखेंना उमेदवारी नाकारताना आमदार संग्राम जगताप यांना उतरवून त्यांच्यासाठी आपलीही जिल्ह्यातील राजकीय ताकद एकवटली आहे. त्यामुळे येत्या १५-२० दिवसात या मतदारसंघात दोन्ही बाजूंनी स्टार प्रचारकांच्या … Read more

आमदार संग्राम जगताप आहेत ‘इतक्या’ कोटींचे मालक

अहमदनगर :- लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्याकडे ८ कोटी ५१ लाख ५३ हजार, तर त्यांची पत्नी शीतल यांच्याकडे ९३ लाख ४३ हजार रुपयांची संपत्ती आहे.  जगताप यांच्यावर २ कोटी ९१ लाखांचे कर्ज असून त्याच्यावर केडगाव हत्याकांडप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. जगताप यांच्याकडे १ लाख ९८ हजार रुपयांची रोकड असून स्टेट … Read more