iPhone 13 : जर तुम्हीही Apple चे चाहते (Fan of Apple) असाल आणि तुम्हाला आयफोन (iPhone) खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे.

लवकरच फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल (Flipkart Big Billion Days Sale) सुरु होत आहे. येथे तुम्हाला स्वस्तात iPhone 13 खरेदी करता येऊ शकतो.

जर तुम्ही आता आयफोन 13 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही थोडी प्रतीक्षा करावी. फ्लिपकार्टवर (Flipkart) बिग बिलियन डेज सेलमध्ये iPhone 13 अतिशय कमी किमतीत (iPhone 13 Price) विकला जाईल.

या दिवसापासून विक्री सुरू होऊ शकते

हा सेल 23 सप्टेंबरपासून सुरू होऊ शकतो. अॅमेझॉन ग्रेट इंडिया फेस्टिव्ह सेल (Amazon Great India Festive Sale) देखील 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

विक्री आणि डील्ससाठी प्राइम वापरकर्त्यांसाठी प्रथम उपलब्ध केले जातील. यानंतर ते उर्वरित युजर्ससाठी उपलब्ध करून दिले जाईल. फ्लिपकार्टने म्हटले आहे की iPhone 13, iPhone 12 आणि iPhone 11 बंपर डिस्काउंटसह (iPhone 11 Bumper Discount) विकले जातील.

कंपनीने आयफोन मॉडेल्सवर उपलब्ध डील्सची माहिती दिलेली नाही. परंतु, या सेलदरम्यान तुम्हाला iPhone 13 वर सर्वोत्तम डील मिळेल. म्हणजेच ते आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत उपलब्ध असेल. तो आतापर्यंत किमान 65,000 रुपयांना विकला गेला आहे.

तर सेल दरम्यान त्याची किंमत 50 हजार रुपयांपासून 60 हजार रुपयांपर्यंत असू शकते. मात्र, ही किंमत बँक डिस्काउंटसह उपलब्ध असेल. याशिवाय या फोनसोबत एक्सचेंज ऑफरही दिली जाईल. यामुळे या फोनची किंमत आणखी कमी होईल.