file photo

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- देशात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने इंधनाच्या दरात वाढ होत आहे.

होणारी वाढ पाहता केंद्र सरकारला पेट्रोल अवघ्या काही दिवसातच 120 रुपये प्रतिलिटर करावयाचे आहे, असे या दरवाढीतून स्पष्ट दिसून येत आहे.

होणारी दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे अक्षरश मोडले आहे. मात्र केंद्राकडून हि दरवाढ सातत्याने सुरूच ठेवण्यात आली आहे. कोरोना सावट अजूनही कमी व्हायचं नाव घेईना.

गेल्या दोन वर्षापासून कोरोनानं थैमान घातलं आहे. त्यामुळे सामान्यांना अनेक आर्थिक संकटांना सामोरं जावं लागलं. यातच गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलचे भाव वाढलेले असून सामान्यांकडून यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सामान्यांना चांगलाच फटका बसला आहे. यातच दोन दिवसांच्या स्थिरतेनंतर आता पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.

वाढलेल्या दरानुसार पेट्रोल 35 पैसे प्रतिलिटर तर डिझेल 37 पैशांनी महागलं आहे. वाढलेले हे दर आज दिवसभरासाठी मर्यादित राहतील. मुंबईत पेट्रोलचा दर 113.80 प्रतिलीटर इतका आहे.

तर डिझेलचा दर 104.75 प्रतिलीटर असणार आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल 107.75 प्रतिलीटर असणार आहे. याशिवाय डिझेल 96.67 इतकं आहे. त्यामुळे इंधन वाढीमुळे लोक आता त्रासले आहेत.

दरम्यान, इंधन दरवाढ अशी सुरु राहिली तर पेट्रोल लवकरच 120 लीटरचा टप्पा पार करेल अशी शक्यता आहे. वाढता पेट्रोल आणि डिझेलचा दर पाहता नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण झालं आहे.