Tata Cars : जर तुम्ही नवीन कार (New Car) खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण टाटा मोटर्स (Tata Motors) आपल्या कारवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे.

या ऑगस्टमध्ये (Augest) टाटाची वाहने 40 हजार रुपयांपर्यंत स्वस्तात खरेदी करता येतील. टाटा मोटर्सची ही ऑफर कंपनीच्या Tiago, Tigor, Harrier आणि Safari सारख्या मॉडेल्सवर उपलब्ध आहे.

मात्र या ऑफरचा (Offer) लाभ केवळ 31 ऑगस्ट 2022 पर्यंतच मिळू शकतो. त्यामुळे लवकर जाणून घ्या कोणत्या मॉडेलवर किती सूट दिली जात आहे.

टाटा सफारी

या कारवर सर्वाधिक सवलत उपलब्ध आहे. कंपनी ऑगस्टमध्ये Safari SUV वर 40,000 रुपयांची कमाल एक्सचेंज सूट देत आहे. या 6/7 सीटर कारची किंमत 15.35 लाख ते 23.56 लाख रुपये आहे.

टाटा हॅरियर

Tata Harrier च्या सर्व प्रकारांवर 40,000 एक्सचेंज सूट उपलब्ध आहे. याशिवाय ग्राहकांना 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूटही मिळू शकते. टाटा हॅरियर ही 5 सीटर एसयूव्ही आहे, ज्याची किंमत 14.70 लाख ते 21.90 लाख रुपये आहे.

टाटा टियागो

कंपनीच्या Tiago हॅचबॅकला XE, XM आणि XT प्रकारांवर 10,000 रुपयांची एक्सचेंज सूट मिळत आहे. XZ आणि त्यावरील व्हेरियंटवर एकूण 20,000 रुपयांची सूट आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की CNG प्रकारावर सूट लागू नाही.

टाटा टिगोर

ही कंपनीची स्वस्त सेडान कार आहे. त्याच्या XE आणि XM प्रकारांवर 10,000 रुपयांची एक्सचेंज सूट मिळत आहे. त्याच्या XZ आणि त्यावरील व्हेरियंटवर एकूण 20,000 रुपयांची सूट आहे. कंपनी Rs.3,000 पर्यंत कॉर्पोरेट सूट देखील देत आहे.

टाटा नेक्सॉन

ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही आहे. त्याच्या पेट्रोल व्हर्जनवर 3,000 रुपयांपर्यंत तर डिझेल व्हर्जनवर 5,000 रुपयांपर्यंत सूट आहे.