Tata Tiago EV : लवकरच टाटा मोटर्स (Tata Motors) इलेक्ट्रिक कार (Electric car) लाँच करणार आहे. Tiago EV असे या मॉडेलचे नाव आहे.

कंपनीची ही सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार (Tata Electric car) असणार आहे. या कार बद्दल कंपनीकडून कोणतीही माहिती समोर आली नाही

टाटा लवकरच 10 नवीन इलेक्ट्रिक मॉडेल्स सादर करणार आहे

पुढील पाच वर्षांत 10 इलेक्ट्रिक मॉडेल्स (Tata Electric models) सादर करण्याचे टाटा मोटर्सचे उद्दिष्ट आहे. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र म्हणाले, “आजचा दिवस आमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रसंग आहे. आम्ही आमच्या ईव्ही सेगमेंटच्या टियागो ईव्हीसह विस्ताराची घोषणा करतो.”

कंपनी येत्या काही आठवड्यात Tiago EV ची किंमत (Tiago EV Price) आणि इतर वैशिष्ट्ये जारी करण्याचा विचार करत आहे. Tiago व्यतिरिक्त टाटा ही इलेक्ट्रिक कार लवकरच लॉन्च करू शकते

Tata Altroz EV

या महिन्याच्या अखेरीस टाटा टियागो इलेक्ट्रिक लॉन्च केल्यानंतर, कंपनी लवकरच आपल्या दुसऱ्या हॅचबॅक कार, टाटा अल्ट्रोझचा ईव्ही (Tata Altroz ​​EV) सेगमेंट लॉन्च करू शकते.

कंपनीने नुकतेच ऑटो एक्सपोमध्ये सादर केले. बाजारात Nexon EV च्या चांगल्या यशानंतर, कंपनी EV सेगमेंटमध्ये आपल्या इतर कार लॉन्च करण्यास उत्सुक आहे.

Tata Punch EV

Tata Tiago व्यतिरिक्त Tata Punch EV ही कार देखील लवकरच बाजारात लॉन्च करू शकते. कंपनीने ही कार (Tata Punch EV) अल्फा आर्क प्लॅटफॉर्मवर बनवली आहे. कंपनी लवकरच त्याची लॉन्च तारीख आणि किंमत जाहीर करू शकते.