Tata Tiago Price Hike: भारतीय ऑटो बाजारात मागच्या अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या मनावर राज्य करणारी कंपनी टाटा मोटर्सने आता आपल्या ग्राहकांना जोरदार धक्का दिला आहे. कंपनीने घेतलेल्या एका निर्णयामुळे आता Tata Tiago खरेदी करण्याचा स्वप्न पाहणाऱ्या ग्राहकांना जोरदार धक्का बसला आहे.

कंपनीने आता आपल्या या लोकप्रिय टियागोच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. कंपनीने हॅचबॅकच्या काही व्हेरियंटच्या किमती वाढवल्या आहेत. किमतीत वाढ झाल्यानंतर आता त्याचा सर्वात स्वस्त व्हेरियंट 5.45 लाख रुपयांपासून सुरू होईल. चला तर जाणून घ्या कोणत्या व्हेरियंटसाठी किती रक्कम मोजावी लागणार आहे.

सर्वात स्वस्त व्हेरियंटची किंमत किती वाढली  

Tata Tiago चे सर्वात कमी किमतीचे व्हेरियंट XE आहे. या व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत आता पाच लाख 44 हजार 900 रुपये आहे. किंमती वाढण्यापूर्वी त्याची एक्स-शोरूम किंमत 5 लाख 39 हजार रुपये होती. त्याची किंमत पाच हजार रुपयांनी वाढली आहे.

या व्हेरियंटची किंमत सर्वाधिक वाढली

Tiago च्या XT व्हेरियंटमध्ये सर्वात मोठी वाढ झाली आहे. त्याची नवीन किंमत 619900 रुपये झाली आहे, तर वाढीपूर्वी त्याची एक्स-शोरूम किंमत 599900 रुपये होती. त्याची किंमत 50 रुपयांनी वाढली आहे. मॅन्युअल XT बरोबरच, ऑटोमॅटिक XTA चीही अशीच किंमत वाढली आहे.

कोणत्या व्हेरियंटची किंमत वाढली नाही

कंपनीने केवळ एका व्हेरियंटच्या किंमतीत वाढ केलेली नाही. ज्या व्हेरियंटची किंमत वाढलेली नाही तो XT RHYTHM व्हेरियंट आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत रु. 649900 आहे. याशिवाय XZ आणि XZA व्हेरियंटला यादीतून वगळण्यात आले आहे. परंतु XZ Plus, XZA Plus, XZ Plus DT आणि XZA Plus DT व्हेरियंट उपलब्ध राहतील.

इतर व्हेरियंटच्या किमती किती वाढल्या?

XTO व्हेरिएंट रु. 5,000, NRG XT रु 8,000, NRG रु 7,000, XZ+ रु 7,000, XZ+ DT रु 8,000, NRG AMT रु 8,000 सात हजार रुपये, XZA प्लसची किंमत सात हजार रुपयांनी वाढली आहे आणि XZA प्लसची किंमत आठ हजार रुपयांनी वाढ केली आहे.

Tiago

CNG Tiago ची किंमत किती वाढणार?

सीएनजी टियागोच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. कंपनीने CNG XE आणि XM ची किंमत 5,000 रुपयांनी, CNG XT ची किंमत 20,000 रुपयांनी, XZ Plus 7 रुपयांनी आणि XZ Plus DT CNG ची किंमत 8,000 रुपयांनी वाढवली आहे.

हे पण वाचा :- Fixed Deposit : खुशखबर ! आता ‘या’ बँकेने दिली कमाई करण्याची मोठी संधी ! ‘त्या’ प्रकरणात घेतला मोठा निर्णय ; वाचा सविस्तर