Ahmednagar News:लग्न होऊन उणेपूरे तीन महीने देखील झाले नव्हते तोच माहेरुन दहा लाख रुपये आणावेत यासाठी होत असलेल्या छळास कंटाळून शिक्षकाच्या पत्नीने आत्महत्या केली आहे.

अंकीता डोईफोडे असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव असून, ही घटना जामखेड तालुक्यात घडली आहे.लग्नानंतर पुढील जीवनाचे सुंदर स्वप्न रंगवलेल्या नवविवाहितेच्या हातावरील मेहेंदीचा रंग फिका होण्यापूर्वीच सासरच्या लोकांनी तिच्या सर्व स्वप्नांची राखरांगोळी केली.

अंकीता हीचे तीन महीन्यापुर्वीच लग्न झाले होते. अंकीता हिचा पती सचिन हा जामखेड येथे शिक्षक म्हणून नोकरी करत आहेत. लग्नानंतर सासरकडील लोकांनी माहेरुन तुझ्या बापाकडुन जामखेड येथे घर विकत घेण्यासाठी दहा लाख रुपये घेऊन ये असे म्हणून तीला उपाशीपोटी ठेऊन तीला शिवीगाळ व मारहाण करण्यात येत होती.

याच त्रासाला कंटाळून अंकीता हीने आत्महत्या केली. या प्रकरणी मयत अंकीताचा भाऊ स्वप्निल केदार याने दिलेल्या फिर्यादीवरून शिक्षक (पती) सचिन सुनिल डोईफोडे, कुसुम सुनिल डोईफोडे, सुनिल दादाराव डोईफोडे, नितीन सुनिल डोईफोडे या चार जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.