Technology News Marathi : ॲपल (Apple) कंपनीकडून लवकरच आयफोन 14 (iphone14) पुढची सिरीज लॉन्च केली जाणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आयफोन 14 खरेदी करण्याबाबत उत्साह वाढला आहे. लवकरच कंपनी आयफोन 14 लॉन्च करण्याची अधिकृत घोषणा करू शकते.

Apple कंपनीला आयफोन 14 वेळेवर लॉन्च करणे हे कंपनीसाठी मोठे आव्हान बनले आहे. कधी त्यांना चिपचा तुटवडा जाणवत आहे तर कधी पुरवठादार टेन्शन देत आहेत.

The Elec मधील एका अहवालानुसार, Apple ने आपल्या iPhone 14 डिस्प्लेसाठी निर्माता BOE टेक्नॉलॉजीकडून नवीन OLED डिस्प्ले डिझाइनचा विचार सुरू केला आहे.

कंपनीने डिस्प्लेमध्ये केलेल्या अनधिकृत डिझाइन बदलांमुळे या टेक जायंटने यापूर्वी चिनी निर्मात्याकडून ऑर्डर निलंबित केल्या होत्या, ज्यामुळे आयफोन 14 OLED स्क्रीनच्या लाखो ऑर्डर्स कमी झाल्या होत्या.

या आठवड्यात निर्णय होईल

BOE ला फेब्रुवारी 2022 च्या सुरुवातीला काही उत्पादन समस्यांचा सामना करावा लागला आणि अखेरीस ऍपलने अनधिकृत उत्पादन बदलांमुळे चीनी इलेक्ट्रॉनिक घटक निर्मात्याकडे दिलेले ऑर्डर निलंबित केले.

आता, BOE आयफोन 14 डिस्प्ले डिझाइनच्या नवीन नमुन्यांसह तयार आहे आणि असे म्हटले जाते की Apple या आठवड्यात त्यांचे मूल्यांकन करेल.

जुलैमध्ये उत्पादन सुरू होऊ शकते

अहवालात म्हटले आहे की नवीन डिझाइनला अंतिम रूप द्यावे की नाही याचा अंतिम निर्णय या महिन्यात घेतला जाऊ शकतो, याचा अर्थ जुलै किंवा ऑगस्टपर्यंत उत्पादन सुरू होऊ शकते.

अहवालात असेही म्हटले आहे की Apple सध्या केवळ आयफोन 14 बेस मॉडेलसाठी नवीन डिस्प्ले नमुन्याचे मूल्यांकन करेल आणि प्रो मॉडेलसाठी नाही.

पूर्वी, BOE ने “पातळ-फिल्म ट्रान्झिस्टरच्या सर्किट रुंदीचा विस्तार केला” असे म्हटले जाते, जे ॲपलच्या माहितीशिवाय, iPhone 13 च्या ऑर्डरसाठी पॅनेलमध्ये वापरले जात होते.