टेक्नोलाॅजी

आता 10 वी पास व्यक्ति देखील कमवू शकते महिन्याला 1 लाख; ड्रोन क्षेत्रातील ट्रेनिंग ठरेल फायद्याची, वाचा ए टू झेड माहिती

Published by
Ajay Patil

सध्या तंत्रज्ञानाचे युग असून जगभरामध्ये प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाने शिरकाव केला असून या तंत्रज्ञानामुळे आता कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर भासू लागली आहे. त्यामुळे अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील कौशल्य जर व्यक्तीने आत्मसात केले तर त्याला नक्कीच चांगल्या पगाराची नोकरी मिळणे देखील आता शक्य झालेली आहे.

अगदी हीच बाब आपल्याला ड्रोनच्या बाबतीत देखील सांगता येईल. आपल्याला माहित आहे की ड्रोनचा वापर आता बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होऊ लागला असून कृषी क्षेत्रामध्ये देखील  मोठ्या प्रमाणावर ड्रोनचा वापर वाढताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची आवश्यकता निश्चित भासणार आहे.

त्यामुळे यात ड्रोन पायलट म्हणजेच ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण खूप महत्त्वाचे असून अशा प्रकारच्या प्रशिक्षण देणाऱ्या संस्था देखील आता देशात उघडल्या जात आहेत.

अशा संस्थांच्या माध्यमातून दोन किलो पासून ते 25 किलो व त्यापेक्षा अधिक वजनाचे ड्रोन उडवण्याचे ट्रेनिंग दिले जात आहे. एवढेच नाही तर अशा पद्धतीने जर तुम्ही देखील ड्रोन उडवण्याची ट्रेनिंग घेतले तर व्यवसायिक दृष्ट्या प्रशिक्षित पायलट्सना अमेरिका तसेच ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्ये देखील नोकरी मिळवता येणे शक्य आहे.

 ड्रोन उडवण्याचे कमर्शियल ट्रेनिंग करिता दहावी पास असणे गरजेचे

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, दहावी पास असलेली कुठलीही व्यक्ती ड्रोन उडवण्याचे कमर्शियल ट्रेनिंग घेऊ शकतो व त्याला त्यानंतर सुरुवातीला वीस हजार रुपये ते एक लाख रुपयापर्यंत महिन्याची नोकरी देशात व दुसऱ्या देशांमध्ये मिळणे शक्य आहे.

सध्या या क्षेत्रातील तज्ञांच्या मते जगभरातील ड्रोन इंडस्ट्री सतत वाढताना दिसून येत असून विविध प्रकारचे सर्वेक्षण, आपत्ती व्यवस्थापन तसेच शेती सारख्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या कामांकरिता आता ड्रोनचा वापर वाढला आहे व त्यामुळे आता ट्रेन अशा ड्रोन चालकांची गरज मोठ्या प्रमाणावर भासत आहे.

त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून देखील अशा ट्रेनिंग कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यात येत आहे. ड्रोन उडवण्यासाठी कमर्शिअल ट्रेनिंग प्राप्त केल्यानंतर डीजीसीए कडून एक प्रमाणपत्र जारी केले जाते.

त्यामागील प्रमुख कारण म्हणजे प्रत्येक ड्रोनला एक युआयएन नंबर दिला असतो व त्या ड्रोनला उडवण्यासाठी कमर्शिअल पायलटची गरज भासते. म्हणजे जसे एखादे वाहन चालवण्यासाठी लायसन्स धारकाची गरज भासते अगदी त्याचप्रमाणे ड्रोन उडवण्यासाठी देखील कमर्शिअल पायलटची आवश्यकता असते.

 ड्रोन उडवण्याचे कमर्शियल ट्रेनिंग कुणासाठी आहे गरजेचे?

मिळालेल्या माहितीनुसार बघितले तर ड्रोन ट्रेनिंग अशा व्यक्तींना आवश्यक आहे ज्यांना त्यापासून कोणत्याही प्रकारचे उत्पन्न मिळत आहे. अशा उत्पन्न मिळत असलेल्या व्यक्तींसाठी ही ट्रेनिंग अनिवार्य आहे. परंतु जर काही व्यक्ती लहान आकाराचे ड्रोन एक आवड म्हणून उडवत असतील तर त्यांच्यासाठी हे ट्रेनिंग आवश्यक नाही. सरकारने याबाबत 2021 मध्ये जे ड्रोन नियम जारी केले आहेत त्यानुसार कमर्शियल ड्रोनच्या वापरासाठी ड्रोन उडवण्याची ट्रेनिंग आवश्यक करण्यात आलेले आहे.

Ajay Patil