40 Inch Smart TV : जबरदस्त ऑफर! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करता येत आहे 40 इंचाचा स्मार्टटीव्ही, कसे ते जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

40 Inch Smart TV : सध्याच्या काळात तुम्हाला जवळपास प्रत्येक घरात स्मार्टटीव्ही पाहायला मिळतात. मागणी वाढली असल्याने अनेक स्मार्टटीव्ही बाजारात येऊ लागले. त्यामुळे त्यांच्या किमतीही खूप जास्त असतात.

काही दिवसांपूर्वी Acer ने आपला Acer Advanced Series 40 इंच स्क्रीन टीव्ही लाँच केला होता. जो तुम्हाला 20000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सहज खरेदी करता येईल. फ्लिपकार्ट तुम्हाला अशी ऑफर देत आहे. पहा संपूर्ण फीचर्स.

Acer Advanced सिरीज 40 इंच टीव्ही

प्लास्टिक बॉडीसह Acer Advanced Series 40 इंच स्क्रीन टीव्ही लॉन्च केला आहे. हे कॉम्पॅक्ट डिझाइन ऑफर करत असून कंपनीने बॉक्समध्ये रिमोट, दोन टेबलटॉप स्टँड, वॉल माउंट स्टँड आणि क्विक स्टार्ट गाईड यांचा समावेश करण्यात आला आहे. कंपनीचा हा स्मार्टटीव्ही काळ्या रंगात खरेदी करता येईल. तसेच स्टँडसह त्याचे वजन 5.57 किलोग्रॅम आहे.

टीव्हीच्या बाजूला पातळ बेझल सापडत असून या स्मार्टटीव्हीच्या अगदी खाली पॉवर बटण आहे, जो लाल एलईडी इंडिकेटरसह येतो. तुम्ही तुमच्या गरजेनुसार टीव्ही भिंतीवर बसवता येईल.

कंपनीचा हा स्वस्त स्मार्ट टीव्ही 2 HDMI, 2 USB पोर्टसह तुम्हाला खरेदी करता येईल. या टीव्हीमध्ये बिल्ट इन वाय-फाय दिले आहे. स्मार्ट टीव्हीमध्ये ब्लूटूथ सपोर्ट दिला आहे.

डिस्प्ले

या स्मार्ट टीव्हीमध्ये 40-इंच फुलएचडी एलईडी स्क्रीन (1080 x 1920 पिक्सेल) दिला आहे. या स्क्रीनचा रीफ्रेश दर 60 Hz असून तो 178 डिग्री पाहण्याचा कोन प्रदान करतो. कंपनीचा हा टीव्ही HDR 10 ला सपोर्ट करतो. यात स्क्रीन HDR 10, इंटेलिजेंट फ्रेम इमॅजिनेशन इंजिन, सुपर ब्राइटनेस सारखी जबरदस्त फीचर्स देते.

जाणून घ्या वैशिष्ट्ये

सर्वात महत्त्वाचे कंपनीचा हा टीव्ही Google TV सह लॉन्च केला आहे. हा स्मार्टटीव्ही फ्रेमलेस डिझाइन ऑफर करतो. स्टोरेजचा विचार केला तर या टीव्हीमध्ये 16 जीबी इनबिल्ट स्टोरेज आणि १.५ जीबी रॅम उपलब्ध आहे.

कंपनीच्या या स्मार्ट टीव्हीमध्ये गुगल प्ले स्टोअर सपोर्ट दिला आहे. या टीव्हीमध्ये यूट्यूब, डिस्ने हॉटस्टार, नेटफ्लिक्स सारखे अॅप सपोर्ट आहेत. या स्मार्ट टीव्हीमध्ये अॅपल टीव्ही सपोर्ट मिळेल.

याच्या कनेक्टिव्हिटीबाबत बोलायचे झाले तर कंपनीने या स्मार्ट टीव्हीसोबत कॉम्पॅक्ट रिमोट देण्यात आला आहे. Google Voice Search सह, वापरकर्ते या रिमोटवरून आवाजाने टीव्ही नियंत्रित करता येईल. या रिमोटमध्ये गुगल व्हॉईस असिस्टंट बटणाशिवाय नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, यूट्यूब आणि डिस्ने हॉटस्टारसाठी वेगळे बटण देण्यात आले आहे.

40 इंच स्क्रीन असणाऱ्या एसरच्या या स्मार्ट टीव्हीमध्ये 30W स्पीकर दिले आहेत जे डॉल्बी ऑडिओला सपोर्ट करतात. समजा तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला गुगल टीव्ही ब्रँडिंगसह टीव्ही खरेदी करायचा असेल, तर तुम्ही Acer कडून हा स्मार्ट टीव्ही सहज खरेदी करू शकता.

हा टीव्ही 20000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल, Android OS ला फ्रेमलेस डिझाइनसह ऑफर करतो. हा टीव्ही कॉम्पॅक्ट असून सर्व लोकप्रिय ओटीटीमध्ये प्रवेश उपलब्ध आहे. कंपनीच्या स्मार्ट टीव्हीमध्ये 30W शक्तिशाली स्पीकर दिले आहेत. हा टीव्ही 1 वर्षाच्या वॉरंटीसह येतो.