अनेकदा माणूस विविध कारणांनी त्रासून आत्महत्येसारखे चुकीचे आणि टोकाचे पाऊल उचलतो. मात्र तुम्ही कधी मशीनने आत्महत्या केल्याचे ऐकले आहे का? मात्र दक्षिण कोरियामधून अशीच एक चकीत करणारी घटना समोर आली आहे.
माणसाप्रमाणे ना दिसणाऱ्या रोबोटला पाहून आपण त्याला कुठल्याही भावना नसल्याचे बोलतो. मात्र दक्षिण कोरियात घडलेल्या या घटनेने जगाला आश्चर्यचकीत केले आहे. कारण येथील एका रोबोटने कामादरम्यान सीडीवरून उडी मारून आत्महत्या केली. सोशल मीडियावर ही बातमी चर्चेचा विषय बनली आहे.
दक्षिण कोरियाच्या गुमी सिटी काऊन्सिलमध्ये कर्मचारी म्हणून काम करणारा हा रोबोट ‘रोबोट सुपरवायझर’ या नावाने ओळखला जात होता. तो लोकांची मदत करत होता आणि कर्मचाऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय देखील होता. मात्र त्याच्या आत्महत्येच्या घटनेने रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) च्या क्षेत्रात एकाच खळबळ उडाली आहे.
एखादी मशीनही आत्महत्येसारखे पाऊल उचलू शकते का ? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. आत्महत्येपूर्वी रोबोट रहस्यमय पद्धतीने एकाच जागी फेऱ्या मारताना दिसून आला. त्यानंतर तो दोन मीटर उंचीच्या सीडीवरून खाली पडला. त्यानंतर त्याची सर्व सिस्टम खराब झाली आणि त्याचा मृत्यू झाला.
आता रोबोटच्या मृत्यूच्या कारणाचा शोध घेण्यासाठी एक विशेष टीम बनवण्यात आली आहे. स्थानिक मीडियाने या घटनेला देशातील पहिली ‘रोबोट आत्महत्या’ असल्याचे म्हटले आहे.
सोशल मीडियावर ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून लोकांनी याबाबत विविध मिश्किल प्रतिक्रिया दिल्या आहेत, पहिल्या व्यक्तीने म्हटले की, कामाच्या व्यापामुळे आता मशीनही आत्महत्येसारखे पाऊल उचलत आहे. तर दुसऱ्याने म्हटले की, रोबोटला एकही दिवस सुट्टी नाही, पगार नाही, त्यामुळे रोबोटलाही संघटनेची गरज आहे.